१८ देश या मतदानाला अनुपस्थित राहिले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इस्रायल-हमास युद्धादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. पॅलेस्टाईनमधील इस्रायली वसाहतींविरोधातील महत्त्वाचा ठराव गुरुवारी (९ नोव्हेंबर) संयुक्त राष्ट्रांमध्ये मांडण्यात आला. यात सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारताने या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. या प्रस्तावाच्या समर्थनार्थ १४५ देशांनी मतदान केले.
या प्रस्तावाच्या विरोधात मतदान करणाऱ्यामध्ये कॅनडा, हंगेरी, इस्रायल, मार्शल आयलंड, फेडरेटेड स्टेट्स ऑफ मायक्रोनेशिया, नाउरू, अमेरिका यांनी याच्याविरोधात मतदान केले. त्याचवेळी, १८ देश या मतदानाला अनुपस्थित राहिले.
संयुक्त राष्ट्रांमध्ये मांडण्यात आलेल्या या ठरावात पॅलेस्टिनी प्रदेशात इस्रायलच्या चुकीच्या कृतींवर टीका करण्यात आली होती. ‘पूर्व जेरुसलेम आणि व्यापलेल्या सीरियन गोलानसह पॅलेस्टिनी प्रदेशातील इस्रायली वसाहती’ या शीर्षकाचा हा ठराव संयुक्त राष्ट्रात बहुमताने मंजूर करण्यात आला.
Again in the UN resolution against Israel India voted in favor of the resolution
महत्वाच्या बातम्या
- WATCH : पंतप्रधानांच्या जाहीर सभेत खांबावर चढली होती मुलगी, पीएम मोदींनी घातली समजूत
- मडिगा आरक्षणासाठी जीवन व्यतीत केलेले मंदा कृष्ण मडिगा मोदींच्या खांद्यावर डोके ठेवून रडले तेव्हा…
- अयोध्येने स्वतःचाच विश्वविक्रम मोडला, राम की पैडीवर एकाच वेळी २२ लाख दिवे झाले प्रज्वलित!
- उत्तराखंडला समान नागरी कायद्याची दिवाळी भेट; पुढील आठवड्यात विधानसभेचे विशेष अधिवेशन!!