• Download App
    उत्तर प्रदेश जिंकले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मिशन गुजरातवर, रोड शोमध्ये ४ लाख लोकांचा सहभाग!! After winning uttar pradesh prime minister narendra modi on mission gujrat

    Modi Mission Gujrat : उत्तर प्रदेश जिंकले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मिशन गुजरातवर, रोड शोमध्ये ४ लाख लोकांचा सहभाग!!

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा गुरुवारी निकाल लागला. यामध्ये चार राज्यात भाजपने दिमाखदार विजय मिळवला. त्यानंतर लगेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मिशन गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर रवाना झालेत. गुजरातमध्ये २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका आहेत.या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा आहे. पंतप्रधान आज अहमदाबादेत ९ किलोमीटरचा एक भव्य रोड शो करणार आहेत. यामध्ये 4 लाख लोक सहभागी करण्याचे भाजपने नियोजन केले आहे. After winning uttar pradesh prime minister narendra modi on mission gujrat

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा कार्यक्रम

    पंतप्रधान मोदी हे सकाळी १० वाजता दिल्लीहून अहमदाबाद विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर ते विमानतळावरुनच रोड शोला सुरुवात करतील. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांचा काफिला १ तासात ९ किलोमीटरचे अंतर कापून सकाळी ११.१५ वाजता गांधीनगरमधील भाजप प्रदेश मुख्यालय कमलम येथे पोहोचेल. पंतप्रधानांच्या या रोड शोमध्ये ४ लाख लोक जमतील असा दावा भाजपने केला आहे.


    Thank you Modiji : युक्रेनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांना भारताची मदत ! विद्यार्थ्यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार


    कोरोनाच्या संकटामुळे गुजरातमध्ये दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या रोड शो ला परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी भाजप राज्य संघटनेकडून जोरदार तयारी करण्यात आली असून, रस्त्याच्या कडेला मोठमोठे पोस्टर बॅनर लावण्यात आले आहेत. संपूर्ण मार्गात भगवे झेंडे लावले आहेत. पंतप्रधानांच्या मार्गात सुमारे 50 टप्पे तयार करण्यात आले आहेत.

    रोड शोनंतर पंतप्रधान मोदी कमलममध्ये राज्य संघटनेची बैठक घेऊन, निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करतील. दरम्यान, अहमदाबादच्या जीएमडीसी मैदानावर सायंकाळी 5 वाजता पंचायत परिषदेचा कार्यक्रम असून, त्यात दीड लाखांहून अधिक लोक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

    गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 मार्चला पंतप्रधान मोदी रक्षा शक्ती विद्यापीठात विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. गुजरात सरकारच्या खेळ महाकुंभाची सुरुवात करतील. मात्र, या सर्व कार्यक्रमांचा उद्देश एकच आहे आणि तो म्हणजे चार राज्यांतील विजयाची लाट गुजरातपर्यंत नेणे, कारण गुजरातमध्ये याच वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत.

    भाजप मिशन गुजरातमध्ये व्यस्त

    गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. याठिकाणी गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून पक्षाला कडवी टक्कर मिळाली होती. मात्र, यावेळी मोदींना काँग्रेसला एकही संधी द्यायची नाही. त्यामुळे पाच राज्यांतील निवडणुका संपताच भाजपने गुजरातमध्ये मिशन सुरु केले आहे.

    After winning uttar pradesh prime minister narendra modi on mission gujrat

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!