प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याच्या हत्येने खळबळ उडाली आहे. जहांगीरपुरीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर अशी घटना घडल्याने दिल्लीत तणाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र, भाजप नेत्याच्या हत्येबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.
After the violence in Jahangirpuri, the assassination of BJP leader caused a stir in Delhi
42 वर्षीय भाजप नेत्याची 20 एप्रिल रोजी दिल्लीतील गाझीपूर भागात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जितू चौधरी असे मृताचे नाव असून तो भाजपचा जिल्हा सचिव होता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 20 एप्रिल रोजी सायंकाळी घडली. स्थानिक पोलीस गस्तीवर होते. तेव्हा लोकांची गर्दी पाहून पोलीस तेथे पोहोचली. हृदय पिळवटून टाकणारे दृश्य होते. गोळ्यांनी छिन्नविछिन्न झालेला जितू चौधरींचा मृतदेह रस्त्यावर पडला होता. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांना तत्काळ रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी जितू यांना मृत घोषित केले.
भाजप नेते जितू चौधरी घरातून बाहेर पडताच, हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. सध्या हल्लेखोरांबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. जितू चौधरी यांचा बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. त्यांचा एका कंत्राटदाराशी लोकेटरच्या व्यवहारावरून वाद सुरू होता. हा वादच त्यांच्या हत्येमागचे कारण असू शकते, असा पोलिसांना संशय आहे. त्याच बरोबर जहांगीरपुरी हिंसाचाराशी हत्येचे कनेक्शन जोडण्यात येत आहे.