नायब सिंह सैनी यांनी PM मोदींची घेतली भेट, अर्धा तास झाली चर्चा
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Haryana हरियाणातील ( Haryana ) पराभव आणि जम्मू-काश्मीरमधील खराब कामगिरीनंतर आघाडीचे सहकारी काँग्रेसवर दबाव आणत आहेत, तर हरियाणात हॅट्ट्रिक झाल्यानंतर भाजपच्या गोटात नवीन सरकार स्थापनेबाबतची हालचाली सुरू आहेत. हरियाणाचे काळजीवाहू मुख्यमंत्री नायब सिंह सैनी आज दिल्लीत असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.Haryana
पंतप्रधानांच्या निवासस्थानी दोघांची भेट झाली. सुमारे अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. हरियाणाच्या विजयाबद्दल सैनी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आणि नवीन सरकार स्थापनेबाबत चर्चा केली.
पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर सैनी हरियाणा भवनात पोहोचले आणि माध्यमांशी बोलले. हरियाणामध्ये नरेंद्र मोदींच्या धोरणांचा आणि योजनांचा विजय झाल्याचे ते म्हणाले. मोदींच्या लोकप्रियतेमुळे भाजपने हरियाणात हॅट्ट्रिक केली ,असे नायब सैनी यांनी सांगितले की, निवडणुकीत काँग्रेसने खोटेपणाचे वादळ निर्माण केले होते, जे जनतेने नाकारले.
हरियाणात भाजपने नायब सिंह सैनी यांच्या तोंडावर निवडणूक लढवली आणि बंपर विजयानंतर आता सैनी यांच्याकडे पुन्हा हरियाणाची कमान सोपवली जाऊ शकते. पीएम मोदींची भेट घेतल्यानंतर सीएम सैनी यांना सीएम चेहऱ्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत नेत्याची निवड केली जाईल आणि संसदीय मंडळाचा निर्णय सर्वांना मान्य असेल.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत ४८ जागा जिंकून भाजप सत्ता कायम ठेवण्यासाठी आणि सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. तर काँग्रेसला ३७ जागा मिळाल्या आहेत. इंडियन नॅशनल लोकदलाने दोन जागा जिंकल्या, तर अपक्ष उमेदवारांनी तीन जागा जिंकल्या. जननायक जनता पक्ष आणि आप या दोन्ही पक्षांना निवडणुकीत यश मिळाले नाही. भाजप आणि काँग्रेसची मतांची टक्केवारी जवळपास समान होती. भाजपला ३९.९४ टक्के, तर काँग्रेसला ३९.०९ टक्के मते मिळाली.
After the victory in Haryana the movement in the BJP fold has accelerated
महत्वाच्या बातम्या
- Nobel Prize : AI गॉडफादर जेफ्री ई. हिंटन आणि अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन जे. होपफिल्ड यांना भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर
- Shagun Parihar : वडील आणि काकांना गोळ्या घालणाऱ्या दहशतवादावर मुस्लिम बहुल किश्तवाड मधून भाजपच्या शगुन परिहारांचा विजय!!
- Muijju : मुइज्जू म्हणाले- भारताच्या सुरक्षेला धक्का पोहोचू देणार नाही, आमचे संबंध चांगले, या भेटीत अधिक दृढ होतील
- Congress : तरुणांचे केले “कोळसे”, ज्येष्ठांना आणले “बाळसे” म्हणून काँग्रेसला सतत पराभवाचे तोंड दिसे!!