विशेष प्रतिनिधी
कोलकता : नंदीग्राममध्ये बंगालच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना पराभूत केलेले विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली.After the meeting of BJP MLAs, P. Governor of Bengal leaves for Delhi
कायद्याचा अभाव आणि राज्य पोलिसांची पक्षपाती भूमिका असे मुद्दे उपस्थित करीत त्यांनी राज्यपालांना हस्तक्षेपाची विनंती केली. पाठोपाठ राज्यपाल जगदीश धनकर यांनी चार दिवसांसाठी दिल्ली दौऱ्यावर जात असल्याचे जाहीर केल्याने प. बंगालमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
अधिकारी यांनी आपली भेट घेऊन राज्यातील सध्याच्या कायदा व सुवव्यस्थेच्या स्थितीबाबत निवेदन दिले. पन्नासपेक्षा जास्त आमदारांनी तीव्र चिंता व्यक्त केल्याचे ट्विट धनकर यांनी सोमवारी केले होते. त्यांनी ममता, बंगाल पोलिस आणि कोलकता पोलिस यांची ट्विटर हँडल टॅग केली होती.
आपल्याला परिस्थितीची जाणीव असून शिष्टमंडळाच्या तक्रारींची दखल घेऊ असेही त्यांनी नमूद केले होते. धनकर बंगालच्या राज्यपालपदी जुलै २०१९ मध्ये रुजू झाले. तेव्हापासून तृणमूल काँग्रेसशी त्यांचे खटके उडाले आहेत.
After the meeting of BJP MLAs, P. Governor of Bengal leaves for Delhi
महत्त्वाच्या बातम्या
- बांगलादेशने भारतासमवेतच्या सीमाबंदीत केली ३० जूनपर्यंत वाढ
- पाकिस्तान ठरतोय गाढवांचा देश, चीनमुळे संख्येत विक्रमी वाढ
- TEAM INDIA WTC FINAL : भारतीय संघाची घोषणा ; रोहितसोबत युवा शुबमन गिलला सलामीला संधीश; विजेत्याला 12 कोटी
- संभाजीराजे यांच्यासमवेत आंदोलनात सहभागी होणाऱ्या प्रकाश आंबेडकरांचा राजकीय होरा काय…??