प्रतिनिधी
पणजी : काश्मीरमध्ये 1990 च्या दशकात झालेल्या हिंदू नरसंहाराचे सत्य दाखवण्याचे धाडस करणार “द काश्मीर फाईल्स” हा सिनेमा आल्यानंतर वेगवेगळ्या फाईल्स वर आधारित सिनेमा प्रदर्शित करण्याच्या मागणी होत आहे. यापैकीच एक “द गोवा फाईल्स” अशा सिनेमाची मागणी गोव्यातून पुढे आली आहे. गोव्यात पोर्तुगीजांनी हिंदू समाजावर अत्याचार केले, त्याच्या कहाण्या भयानक आहे. यावरच आधारित “द गोवा फाईल्स” सिनेमा तयार करावा, अशी मागणी गोव्यातून पुढे येत आहे. after The Kashmir Files – now Goa Files film came
काश्मीरमधील हिंदू संहाराचे सत्यकथन ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटातून केले आहे. हिंदूंचा वंशविच्छेद झालेला काश्मीर हा एकच भाग नाही, तर गोव्यातही हिंदूंचा नरसंहार झाला होता, याची आठवण करून देण्यात आली आहे.
सुभाष वेलिंगकर यांची मागणी
गोव्याच्या राजकारणात एक लक्षवेधी व्यक्तिमत्व म्हणजे सुभाष वेलिंगकर आहे. संघाच्या मुशीत जडणघडण झालेले वेलिंगकर स्थानिक राजकारणातील मतभेदामुळे भाजपपासून वेगळे झाले, तरी विचारधारा सोडली नाही. वेलिंगकर यांनी ट्विट करून गोवा फाईल्स नावाने चित्रपट काढण्याची मागणी केली आहे. ‘आता गोवा फाईल्स ही येऊ द्यात! धर्माच्या नावाने चर्च संस्थेने पोर्तुगीज सत्ता टिकवण्यासाठी २५० वर्षे गोवा इन्क्विझिशन खाली केलेला हिंदू वंशविच्छेद पुढच्या पिढ्यांना कळू द्यात!…अजून बाकी आहे! जीनांचे ‘direct action’, फाळणी, नौखाली, हैद्राबाद, केरळचे मोपला, गांधीजी व इंदिरा गांधी हत्येनंतरची सगळीच हिंदू हत्याकांडे… हिंदूंना माहित कुठे आहेत?, असे वेलिंगकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
– काय आहे गोवा इन्क्विझिशन?
वर्ष १५६० ते १८१२ या २५२ वर्षांच्या काळात पोर्तुगिजांकडून चालवण्यात आलेल्या इन्क्विझिशनद्वारे हिंदूंना ख्रिश्चन बनवण्यात आले. ख्रिश्चन झालेल्या हिंदूंनी ख्रिश्चन धर्माचे पालन न केल्यास त्यांना अत्यंत अमानुष पद्धतीने शिक्षा दिली जात होती. हा इतिहास भारतीयांना कधीही शिकवला गेला नाही आणि जात नाही. यावर चर्चाही केली जात नाही. आज गोव्यातील चर्च जी गोव्याची संस्कृती म्हणून सांगितली जात आहे, ती संस्कृती नसून मानवी विकृती होती आणि चर्च संस्थांचा हाच अमानवी इतिहास कुठेही सांगितला जात नाही, त्यामुळे काश्मीर फाईल्सच्या निमित्ताने हा इतिहास उजेडात यावा, अशी मागणी होवू लागली आहे.
अशा प्रकारे हिंदूंवर झाले होते अत्याचार!
पोर्तुगीज जबरदस्ती करूनही जे हिंदू बाणेदारपणे धर्मांतर नाकारत असत, त्यांना जाळून टाकले जाई. काही जण ख्रिश्चन धर्म स्वीकारत त्यांना सोडून दिले जाई. पण तोही अपमानच होता. यांच्या शिक्षा भयंकर होत्या. दोषी माणसाला हात मागे बांधून कप्पीला अडकवले जात. आणि अर्धा तास वर खाली वर खाली करत. हात बांधलेले असत त्यामुळे सांधे अवघडून जात. वेदनांनी तो किंचाळायला लागत किंवा त्याला लोखंडी कांबेला बांधून सतत पाण्याचा मारा केला जात.
दोषी आढळलेल्यांना अधांतरी टांगले जात. त्यांच्या पायांना ज्वलनशील पदार्थ बांधत आणि खाली आग पेटवत. तो माणूस गुन्हा कबूल करेपर्यंत आग वाढवत नेत.
स्त्रियांना फार क्रूर अत्याचारांना सामोरे जावे लागले. स्त्रियांवर लोकांची झुंबड उडे. त्यावेळी त्या स्त्रियांचे हालहाल केले जायचे. त्यांचे स्तन कापले जायचे, त्यांना नग्न करून त्यांच्या शरीरात लांब खिळे घुसवले जात.
गर्भधारणा झालेल्या स्त्रियांवर इतका अमानुष अत्याचार केला जात की, त्यात त्यांचा आधी गर्भपात होत नंतर त्या स्त्रीचा जीव जात असे.
आरोपींना त्यांच्या नातेवाइकांसमोर टॉर्चर केले जात असे. आरोपींच्या पापण्या, हातपाय अत्यंत क्रूरतेने कापण्यात येत असत. फक्त धड आणि डोकं शिल्लक राहिलं तरी माणूस जिवंत राहत असे.
डियागो दे बोर्डा (एक प्रिस्ट) त्याचा सल्लागार व्हीकर जनरल, मिगुएल व्हाज ह्यांनी हिंदूंना टॉर्चर करण्यासाठी ४१ मुद्द्यांचा एक आराखडा तयार केला होता.
after The Kashmir Files – now Goa Files film came
महत्त्वाच्या बातम्या
- युक्रेनमध्ये अडकलेल्या बांगलादेशींची भारताकडून सुटका
- गोव्यात भाजप सरकारच्या शपथविधी जय्यत तयारी; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मान्यवर मंडळींची उपस्थिती
- अभिनेत्रीपाठोपाठ बॅले डान्सरचाही मृत्यू; रशियाचे युक्रेनवरील हल्ले अद्याप सुरूच
- कोरोनाबाबत सावधान ; मुंबईत वाढतायत कोरोनाचे रुग्ण; दक्षता घेण्याच्या आरोग्य सचिवांच्या सूचना