उमेश पाल यांच्यी पत्नीची प्रतिक्रियाही समोर आली आहे, जाणून घ्या काय म्हणाल्या आहेत.
विशेष प्रतिनिधी
प्रयागराज : उत्तरप्रदेश STF सोबत झालेल्या चकमकीत पोलिसांच्या तावडीत असलेला माफिया डॉन अतिक अहमद याचा मुलगा असद अहमद ठार झाला आहे. उमेश पाल खून प्रकरणात असद अनेक दिवसांपासून फरार होता. त्याच्यासोबत आणखी एक कुख्यात गुन्हेगार गुलामही चकमकीत मारला गेला आहे. यानंतर उमेश पाल यांच्या आई व पत्नी मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांचे आणि पोलिसांचे आभार मानले. After the encounter of Atiq Ahmeds son Asad Umesh Pals mother thanked Chief Minister Yogi
उमेश पाल यांच्या आई म्हणाल्या, ‘’मी मुख्यमंत्री योगींचे आभार व्यक्त करते. या अगोदर आम्ही एन्काउंटर व्हावं अशी मागणी करत होतो, आमच्या हाती केवळ मागणी करणं एवढंच होतं. परंतु मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला आणि पोलिसांनी जी कामगिरी केली त्याबद्दल मी आभार व्यक्त करते. आता जे काही झालं हे ते कायद्यानुसार झालं आहे, पुढे जे काही असेल त्याबाबत प्रशासन विचार करत आहे. मुख्यमंत्री आणि पोलीस विभागावर आम्हाला अगोदरपासून विश्वास होता. तो विश्वास आज मला दिसला, माझ्या मुलाचे दोन मारेकरी मारले गेले.’’
याशिवाय उमेश पाल यांच्या पत्नीनेही प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘’मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धन्यवाद देते. त्यांनी आज एवढी मोठी गोष्ट केली. त्यांनी जे केलं आहे ते अतिशय चांगलं केलं आहे. त्यांनी आपल्या मुलीच्या पतीच्या मारेकऱ्यांना शिक्षा दिली. मी त्यांचे पुन्हा,पुन्हा आभार व्यक्त करते. न्याय तर झालाच आहे आणि पुढेही न्याय मिळावा, अशी मी मागणी करेन. पोलीस कर्मचाऱ्यांनी खूप मदत केली. मुख्यमंत्री जे करतील ते चांगलंच करतील. प्रशासन मला न्याय मिळवून देत आहे.’’
यूपी एसटीएफच्या वतीने चकमकीबद्दल माहिती देताना सांगण्यात आले की, अतिक अहमदचा मुलगा असद आणि मकसूदचा मुलगा गुलाम हे प्रयागराजच्या उमेश पाल हत्याकांडात हवे होते, दोघांवर पाच लाख रुपयांचे बक्षीस होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. यादरम्यान झाशीमध्ये डीएसपी नवेंदू आणि डीएसपी विमल यांच्या नेतृत्वाखाली यूपी एसटीएफ टीमसोबत झालेल्या चकमकीत दोघेही मारले गेले. त्यांच्याकडून परदेशात बनवलेली अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
याचबरोबर, उत्तरप्रदेश STFचे एडीजी अमिताभ यश यांनी मीडियाला सांगितले की, असद आणि गुलाम यांना जिवंत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी एसटीएफच्या टीमवर गोळीबार केला, त्यानंतर प्रत्युत्तरादाखल झालेल्या कारवाईत ते दोघेही ठार झाले.
After the encounter of Atiq Ahmeds son Asad Umesh Pals mother thanked Chief Minister Yogi
महत्वाच्या बातम्या
- काश्मिरात एक लाखाहून जास्त काश्मिरी पंडित होणार मतदार, भाजपने म्हटले- काश्मिरी पंडितांना लोकशाही अधिकार देण्याच्या दिशेने मोठे पाऊल
- कर्नाटकात भाजपची 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, त्यात 2 महिलांचा समावेश; 7 विद्यमान आमदारांची तिकिटे कापली
- स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वंशजांनी राहुल गांधींविरोधात दाखल केला मानहानीचा खटला
- ‘’मग Penguin आणि UTने सालियानच्या केसच्या भितीने…’’; नितेश राणेंनी साधला निशाणा!