• Download App
    असद अहमदच्या ‘एन्काउंटर’ नंतर मुख्यमंत्री योगींकडून ‘STF’चे कौतुक; तातडीने बोलावली महत्त्वाची बैठक!After the encounter of Atiq Ahmeds son Asad and his aide CM Yogi Adityanath took a meeting on law and order

    असद अहमदच्या ‘एन्काउंटर’ नंतर मुख्यमंत्री योगींकडून ‘STF’चे कौतुक; तातडीने बोलावली महत्त्वाची बैठक!

    उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले हे गुन्हेगारांसाठी हा एक संदेश आहे.

    विशेष प्रतिनिधी

    प्रयागराज : उमेश पाल खून प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत माफिया अतिक अहमदचा मुलगा असद याचा खात्मा केला आहे. उत्तर प्रदेश एसटीएफने सुमारे ५० दिवसांपासून फरार असलेल्या असदला आज झाशी येथे शोधून काढले आणि चकमकीत मारले. या यशाबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एसटीएफचे कौतुक केले आहे. After the encounter of  Atiq Ahmeds son Asad and his aide CM Yogi Adityanath took a meeting on law and order


    अतिक अहमदचा मुलगा असदचं ‘एन्काउंटर’ झाल्यानंतर उमेश पालच्या आईने मानले मुख्यमंत्री योगींचे आभार, म्हणाल्या…


    माफिया डॉन अतिक अहमदचा मुलगा असद आणि त्याचा सहकारी गुलाम यांच्या एन्काउंटरनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेबाबत महत्त्वाची बैठक बोलावली.

    सीएमओने सांगितले की, प्रधान सचिव गृह संजय प्रसाद यांनी मुख्यमंत्र्यांना चकमकीची माहिती दिली आणि संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री योगी यांनी यूपी एसटीएफ तसेच डीजीपी, विशेष डीजी कायदा आणि सुव्यवस्था आणि संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे.

    उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही या चकमकीबद्दल एसटीएफचे कौतुक केले आणि ही कारवाई ‘गुन्हेगारांसाठी संदेश’ असल्याचे म्हटले. एएनआयशी बोलताना मौर्य म्हणाले, ‘या कारवाईसाठी मी यूपी एसटीएफचे अभिनंदन करतो. असद आणि त्याचा सहकारी गुलाम यांनी पोलिसांवर गोळीबार केल्यावर त्यांना प्रत्युत्तर दिले गेले. ते म्हणाले, ‘हा नवा भारत आहे हा गुन्हेगारांना संदेश आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार आहे, समाजवादी पक्षाचे नाही, ज्यांनी गुन्हेगारांना संरक्षण दिले होते.

    After the encounter of  Atiq Ahmeds son Asad and his aide CM Yogi Adityanath took a meeting on law and order

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!