विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सेमी फायनल निवडणुकांमध्ये बसलेल्या फटक्यानंतर काँग्रेसलाINDI आघाडीची बैठक रद्द करावी लागली. कारण प्रादेशिक पक्षांचे बडे नेते काँग्रेसवर नाराज झाले. मात्र, या बैठकीची रद्द झाल्याची बातमी आल्यानंतर अखिलेश यादवांनी INDI आघाडी मजबूत होईल, असे सांगून काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळले आहे. After the defeat of the semi-final, the meeting of the INDI alliance was canceled due to the displeasure of the big leaders
याची कहाणी अशी :
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल येण्यापूर्वीच काँग्रेसने INDI आघाडीची बैठक 6 डिसेंबर रोजी नियोजित केली होती. त्याला आघाडीतल्या सगळ्या बड्या नेत्यांची मान्यता देखील होती. हे निकाल लागत नव्हते, तोपर्यंत सगळे नेते 6 डिसेंबरच्या बैठकीबद्दल आशावादी होते. पण या राज्यांच्या विधानसभांचे निकाल लागले. तीन राज्यांमध्ये काँग्रेसला फटका बसला. एका राज्यात प्रादेशिक पक्षाला फटका बसला आणि सगळीकडे भाजपचा विजय झाला. त्यामुळे INDI आघाडीतल्या प्रादेशिक नेत्यांमध्ये धुसफुस पुन्हा सुरू झाली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेसने बोलावलेल्या INDI आघाडीच्या बैठकीला जायला नकार दिला. त्यांच्या पाठोपाठ चक्रीवादळाचे निमित्त सांगून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी देखील दिल्लीत यायला नकार दिला. आता हे बडे नेतेच INDI आघाडीच्या बैठकीत उपस्थित राहणार नाहीत हे पाहून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बैठक रद्द करून टाकली. पण “एस्केप रूट” म्हणून बाकीच्या नेत्यांची अनौपचारिक बैठक होईल, असे काँग्रेस प्रवक्त्यांनी जाहीर केले. पण यातून प्रादेशिक नेत्यांची काँग्रेसवरची नाराजी लपून राहिली नाही.
दरम्यानच्या काळात ही बैठक रद्द झाल्याची बातमी आल्यानंतर मात्र लखनऊमध्ये अखिलेश यादवांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळले.
अखिलेश यादवांचे तर्कट
मध्यप्रदेश सोडून बाकी सगळ्या राज्यांमध्ये जनतेने परिवर्तनासाठी मत दिले हे मान्य केले, तर हा भाजपसाठी चिंतेचा विषय आहे. कारण तिथल्या प्रदेशातल्या लोकांनी सत्तेवर असलेल्या सरकारला नाकारले आहे. त्यामुळे हेच परिवर्तनाचे मत लोकसभा निवडणुकीत देखील पडेल, असा दावा अखिलेश यादव यांनी केला.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मार बसला. या मारावर फक्त तेलंगणातल्या मतदारांनी सत्तेची फुंकर घातली. पण तेलंगणात काँग्रेसने भारत राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षाचा पराभव केल्याने प्रादेशिक पक्षांचे नेते काँग्रेसवर संतापले. त्यामुळेच INDI आघाडीची बैठक काँग्रेसला रद्द करावी लागली. पण ही बैठक रद्द होईपर्यंत अखिलेश यादव काही बोलले नाहीत. ही बैठक रद्द झाल्याची बातमी आल्यानंतर मात्र अखिलेश यादवांना कंठ फुटला आणि त्यांनी INDI आघाडी मजबूत होईल, असे वक्तव्य करून काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळले.
After the defeat of the semi-final, the meeting of the INDI alliance was canceled due to the displeasure of the big leaders
महत्वाच्या बातम्या
- ‘मिग्जोम’ चक्रीवादळ आता आंध्र प्रदेशात धडकणार; चेन्नईत पाच जणांचा मृत्यू
- Chhattisgarh Result : हिंसाचारात मुलगा गमावलेल्या ईश्वर साहूंनी भाजपच्या तिकीटावर लढत काँग्रेसच्या मंत्र्याचा केला पराभव!
- मिझोराममध्ये ZPM विजयी, MNF सत्तेतून बाहेर, कॉंग्रेसला मिळाली फक्त एक जागा
- I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीला ममता बॅनर्जी जाणार नाही, म्हणाल्या…