- आतापर्यंत 351 कोटी रुपये वसूल झाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस खासदार धीरज प्रसाद साहू यांच्यावर आयकर विभागाची कारवाई आठवडाभरापासून सुरू आहे. खासदारांच्या घरातून आतापर्यंत सुमारे 351 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यानंतर आता आयकर विभाग आता खासदारांच्या घरातून सोने आणि महागडे दागिने शोधत आहे.After the cash found in Dheeraj Sahus house the search for gold in the house is now on
याची चौकशी करण्यासाठी आयकर विभागाने पूर्ण तयारी केली आहे. आयकर विभागाची टीम घराच्या आत खोदकाम करणार आहे. आयकर विभागाचे पथक मंगळवारी सायंकाळी जिओ सर्व्हिलन्स सिस्टीम मशीनसह दाखल झाले. या मशिनद्वारे घराच्या आतील जमिनीत कुठलेही सोने किंवा धातू दडवले गेले आहे का, याचा शोध घेतला जाणार आहे.
6 डिसेंबर रोजी आयकर विभागाने करचोरी प्रकरणात बौद्ध डिस्टिलरी आणि त्याच्या प्रवर्तकांवर छापे टाकण्यास सुरुवात केली होती. पश्चिम बंगाल, ओरिसासह धीरज साहू यांच्या रांची येथील रेडियम रोडवरील घरावर छापे टाकण्यात आले. छाप्यात आतापर्यंत 351 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
त्याचबरोबर आता खासदार साहू यांच्या घरातील जमिनीत सोने, महागडे दागिने किंवा कुठलीही धातू आहे का, याचा शोध घेण्यासाठी आयकर विभागाची टीम जिओ सर्व्हिलन्स मशिनसोबत गेली आहे. आता खोदकाम करताना खासदारांच्या घरातून सोने जप्त होते का, हे पाहायचे आहे.
After the cash found in Dheeraj Sahus house the search for gold in the house is now on
महत्वाच्या बातम्या
- सुरक्षाभंग करून लोकसभेत घुसखोरी; दिल्ली पोलिसांनी दिली “ही” महत्त्वाची माहिती!!
- संसदेत सुरक्षाभंग करून घुसलेल्या तीन घुसखोरांपैकी एकजण लातूरचा; दोघांनी मारल्या उड्या!!; एकाला संसदेबाहेरच अटक
- केरळच्या राज्यपालांचा रस्त्यावर पाठलाग, मुख्यमंत्री लोक पाठवत असल्याचा आरोप; पोलिसांचीही मिलीभगत
- लोकसभेत सुरक्षेचा भंग; प्रेक्षक गॅलरीतून दोन युवकांची सभागृहात उड्या; संसदेवरील हल्ल्याच्या स्मृतीदिनी गंभीर घटना!!