• Download App
    मुलीच्या जन्मानंतर पाणीपुरीवाल्याने वाटल्या तब्बल ४० हजार रुपयांच्या पाणीपुऱ्या चक्क मोफत |After the birth of her daughter, Panipuriwala thought that Panipuri worth Rs. 40,000 was absolutely free

    मुलीच्या जन्मानंतर पाणीपुरीवाल्याने वाटल्या तब्बल ४० हजार रुपयांच्या पाणीपुऱ्या चक्क मोफत

     

    भोपाळ – ‘बेटी है तो कल है‘ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करीत भोपाळमधील पाणीपुरी विक्रेत्याने मुलीच्या जन्मानंतर चक्क पाणीपुरीचे मोफत वाटप केले. त्याच्या या अनोख्या पाणीपुरी पार्टीचा आस्वाद घेण्यासाठी भोपाळवासियांनी चांगलीच गर्दी केली होती.After the birth of her daughter, Panipuriwala thought that Panipuri worth Rs. 40,000 was absolutely free

    अंचल गुप्ता असे त्याचे नाव आहे. कोलार परिसरात त्याने पाणीपुरीची जंगी पार्टी दिली. सुमारे ३५ ते ४० हजार रुपयांची पाणीपुरी मोफत वाटल्याची माहिती देऊन तो म्हणाला की, मुलगा आणि मुलीत भेद करू नका असा संदेशही मी चटकदार पाणीपुरीबरोबरच लोकांना दिला.



    अंचल ३० वर्षांचा आहे. त्याने आठवीत शाळा सोडली. तो म्हणाला की, लग्न झाल्यापासून मला मुलगी हवी होती, पण दोन वर्षांपूर्वी पहिला मुलगा झाला होता. नुकतेच कन्यारत्न झाले. काल मुलाचा दुसरा वाढदिवसही होता. त्यामुळे मुलीच्या आगमनाची घोषणा अशा पद्धतीने करायचे मी ठरविले. अंचलची पत्नी पदवीधर आहे. तिच्यासाठी तो शिलाई केंद्र सुरु करणार आहे.

    After the birth of her daughter, Panipuriwala thought that Panipuri worth Rs. 40,000 was absolutely free

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते

    Election Commission : 12 राज्यांमध्ये SIR- मसुदा यादीत 13% मतदार कमी झाले; UP मध्ये सर्वाधिक 2.89 कोटी मतदार यादीतून वगळले

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- रस्ते भटक्या कुत्र्यांपासून मोकळे करणे आवश्यक; ते अपघातांना कारणीभूत