• Download App
    एकट्याच अशोक चव्हाणांचा राजीनामा नव्हे; ठाकरे - पवारांच्या पक्षांपाठोपाठ गांधी परिवाराच्या पक्षाला मोठे खिंडार!! After Thackeray - Pawar's parties, the Gandhi family's party is in big trouble!

    एकट्याच अशोक चव्हाणांचा राजीनामा नव्हे; ठाकरे – पवारांच्या पक्षांपाठोपाठ गांधी परिवाराच्या पक्षाला मोठे खिंडार!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यपदाबरोबरच भोकरच्या मतदारसंघाच्या आमदारकीचाही राजीनामा दिला. पण हा एकट्याच अशोक चव्हाणांचा राजीनामा आहे असे नव्हे, तर ठाकरे – पवारांच्या पक्षांच्या पाठोपाठ गांधी परिवारापुरता उरलेल्या काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पाडण्याचा हा डाव असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. After Thackeray – Pawar’s parties, the Gandhi family’s party is in big trouble!

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगे आगे देखो होता है क्या!!, असे सूचक उद्गार आजच पत्रकार परिषदेत काढले. त्या मागचे खरे इंगित हेच आहे की, एकट्या अशोक चव्हाण यांचाच काँग्रेसचा अथवा आमदारकीचा राजीनामा अपेक्षित नसून त्यांच्याबरोबर आणखी किमान 15 काँग्रेस आमदार राजीनामा देण्याच्या स्थितीत असल्याची चर्चा आहे. पण त्याचबरोबर भाजपची शक्ती वाढण्याच्या शक्यता निर्माण झाल्याबरोबर पवारनिष्ठ मराठी माध्यमांनी काँग्रेसच्या आमदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पर्याय खुला असल्याची पुडी देखील सोडली आहे.

    अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ विश्वजीत कदम, हिरामण खोसकर, अस्लम शेख, सुलभा खोडके, अमीन पटेल हे आमदार देखील काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची बातमी समोर आली आहे. मात्र यासंदर्भात आपण आत्ताच कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही, असे सूचक उद्गार आमदार विश्वजीत कदम यांनी काढले आहेत.



    काँग्रेसमधल्या या संभाव्य फुटीचा धोका लक्षात घेता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ऍक्टिव्ह होऊन छत्तीसगड कडे रवाना झाले आहेत. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा छत्तीसगडमध्ये आहे. ते तिथे जाऊन राहुल गांधींची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर उद्या दिल्लीला जाऊन ते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेणार आहेत, असे त्यांच्या सूत्रांनी सांगितले.

    काँग्रेसमध्ये बसलेल्या या धक्क्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये हालचाली वाढल्या असल्या तरी प्रत्यक्षात ठाकरे पवारांच्या पक्षांबरोबरच गांधी परिवारापुरत्या उरलेल्या पक्षाला खिंडार पाडण्याचा हा मोठा डाव असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा रस्त्यावर आहे, पण त्यांनी काँग्रेस संघटना वाऱ्यावर सोडली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून अनेक आमदार कमळाच्या मार्गावर आहेत, असे बोलले जात आहे.

    After Thackeray – Pawar’s parties, the Gandhi family’s party is in big trouble!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य