• Download App
    फायझर लशीचा डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांत घटते रोगप्रतिकारक शक्ती, बूस्टर डोसची लागणार गरज After six months immunity goes down

    फायझर लशीचा डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांत घटते रोगप्रतिकारक शक्ती, बूस्टर डोसची लागणार गरज

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन – अमेरिकेमध्ये तयार झालेल्या फायझर लशीचा डोस घेतल्यानंतर शरीरात तयार झालेली रोगप्रतिकारक क्षमता सहा महिन्यानंतर ८० टक्क्यांनी कमी होत असल्याचे एका अभ्यासातून दिसून आले आहे. After six months immunity goes down

    लसीकरण झाल्यानंतरही ज्येष्ठ नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती काही महिन्यांनंतर कमी होत असल्याने त्यांना बूस्टर डोस द्यावा, अशी मागणी होत होती. या ताज्या अभ्यासानंतर या मागणीला बळ मिळण्याची आशा संशोधकांनी व्यक्त केली आहे.



    वृद्धाश्रमात राहणाऱ्या आणि लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केल्यावर ही बाब दिसून आली आहे.

    अमेरिकेतील केस वेस्टर्न विद्यापीठ आणि ब्राऊन विद्यापीठ येथील संशोधकांनी याबाबत अभ्यास केला आहे. लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर सहा महिन्यानंतर शरीरात निर्माण झालेल्या ८० टक्के अँटिबॉडी कमी होत असल्याचे त्यांना आढळून आले. याबाबतचा अहवाल अद्याप अधिकृतपणे प्रसिद्ध झालेला नाही.

    विशेष म्हणजे, ४८ वर्षांवरील काही व्यक्तींच्या केलेल्या तपासणीनंतरही हाच निष्कर्ष निघाला आहे. यापूर्वी झालेल्या एका संशोधनात, लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या शरीरात निर्माण झालेल्या अँटिबॉडी दोन आठवड्यानंतर कमी होत असल्याचे दिसून आले होते. तसेच, हे प्रमाण तरुणांच्या शरीरात कमी होणाऱ्या अँटिबॉडीपेक्षा अधिक होते.

    After six months immunity goes down

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shashi Tharoor : शशी थरूर म्हणाले- नेहरूंच्या चुका स्वीकारणे आवश्यक, पण प्रत्येक समस्येसाठी त्यांना एकट्याला दोषी ठरवणे चुकीचे

    Delhi Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते

    Election Commission : 12 राज्यांमध्ये SIR- मसुदा यादीत 13% मतदार कमी झाले; UP मध्ये सर्वाधिक 2.89 कोटी मतदार यादीतून वगळले