विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमीचा वाद सुप्रीम कोर्टात मिटल्यानंतर तिथे भव्य राम मंदिर उभे राहून 22 जानेवारी रोजी श्रीराम लल्लांची त्या मंदिरात प्रतिष्ठापना होत आहे, पण राम जन्मभूमीचा संघर्ष प्रत्यक्ष मैदानावर, सरकारी पातळीवर आणि कोर्टामध्ये अत्यंत तीव्र आणि वेदनादायी होता. अनेकांचे प्राण त्यात गेले. अनेकांना सर्वस्व गमवावे लागले. असेच सर्वस्व गमावण्याची वेळ ज्येष्ठ पुरातत्व शास्त्रज्ञ के. के. मोहम्मद यांच्यावर आली होती. त्यांचा अपराध केवळ हा होता की, त्यांनी वादग्रस्त बाबरी ढाच्याखाली राम मंदिराचे अवशेष मिळाल्याचे जाहीर सांगितले. त्यामुळे काँग्रेसच्या पाठिंब्यावर त्यावेळी उभ्या असलेल्या चंद्रशेखर सरकारने के. के. मोहम्मद यांच्या नोकरीवर गदा आणण्याचे कारस्थान रचल्याची माहिती खुद्द त्यांनीच सांगितली.After saying that the remains of the Ram Temple were found under the controversial Babri Dhakha, K. K. Mohammed’s job was in danger!!
ही कहाणी अशी :
1976 – 77 मध्ये आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने सिमलातील ॲडव्हान्स स्टडीचे संचालक बी. बी. लाल यांच्या नेतृत्वाखाली एका टीमला अयोध्येतील वादग्रस्त ढाच्याखाली खोदाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या टीमने तिथे खोदाई केली आणि त्यावेळी टीमला राम मंदिराचे 12 खांब आढळून आले. त्यावेळी के. के. मोहम्मद हे आर्किऑलॉजीचे विद्यार्थी होते आणि बी. बी. लाल यांच्या टीम मधले ते एकमेव मुस्लिम सदस्य होते. त्यांच्या खेरीज विद्यमान काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांच्या पत्नी जयश्री रमेश या देखील खोदाई टीमच्या सदस्य होत्या. या टीमने प्रत्यक्ष वादग्रस्त ढाच्या जवळ खोदाई केली आणि त्यांना राम मंदिराचे बारा खांब तिथे आढळून आले. या संदर्भातला सर्वेक्षण अहवाल टीमचे प्रमुख बी. बी. लाल यांनी यथावकाश तत्कालीन सरकारला सोपवला. परंतु, त्यावेळच्या सरकारने तो उघड केला नाही.
मात्र 1990 च्या दशकात चंद्रशेखर सरकारच्या काळात इतिहासकार इरफान हबीब आणि रोमिला थापर यांनी वादग्रस्त बाबरी ढाच्यासंदर्भात एक जाहीर वक्तव्य केले. त्या ढाच्याखाली बी. बी. लाल यांच्या टीमला काहीही आढळले नाही, असे ते वक्तव्य होते. त्यामुळे बी. बी. लाल यांनी पुढे येऊन संबंधित इतिहासकारांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे सांगत वादग्रस्त ढाच्याखाली खोदाई केल्यानंतर मंदिराचे 12 खांब आढळल्याचे स्पष्ट सांगितले. मात्र त्या काळात सरकारी यंत्रणेवर इरफान हबीब यांचा वरचष्मा असल्याने बी. बी. लाल सरकारी सिस्टीम मध्ये एकटे पडले.
त्यावेळी प्रोफेसर के. के. मोहम्मद हे मद्रास मध्ये भारतीय पुरातत्व खात्याच्या कार्यालयात उपअधीक्षक म्हणून कार्यरत होते. बी. बी. लाल यांच्या टीमचे सदस्य असल्याने ते पुढे आले आणि त्यांनी बी. बी. लाल यांना पाठिंबा देणारे वक्तव्य जारी केले. वादग्रस्त बाबरी ढाच्याखाली मंदिराचे 12 खांब आढळले असल्याचे के. के मोहम्मद यांनी सांगितले.
मात्र त्यामुळे चंद्रशेखर सरकारची यंत्रणा हलली. चंद्रशेखर सरकार त्यावेळी काँग्रेसच्या टेकूवर उभे होते. त्यामुळे काँग्रेसची भूमिका त्यांना पुढे रेटणे भाग होते. चंद्रशेखर सरकार मधल्या अधिकाऱ्यांनी के. के. मोहम्मद यांची नोकरी घालवण्याचे ठरवले.
मद्रास मध्ये एका सेमिनारच्या वेळी तत्कालीन केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव आर. के. त्रिपाठी आणि आर्किलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे संचालक एन. सी. जोशी आले होते. त्यांनी के. के. मोहम्मद यांना बोलवून घेऊन वादग्रस्त ढाच्याखाली मंदिराचे अवशेष आढळल्याचे का सांगितले??, अशी विचारणा केली. त्यावर के. के. मोहम्मद यांनी उत्तर दिले. परंतु त्या उत्तरावर दोघांचेही समाधान झाले नाही. त्यानंतर त्यामुळे के. के. मोहम्मद यांना आपल्या नोकरीवर गदा आल्याचे जाणवले. मात्र के. के. मोहम्मद यांची नोकरी गेली नाही, तर त्यांची मद्रासून गोव्याला बदली करण्यात आली. चंद्रशेखर यांचे सरकार गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या, संदर्भ बदलले आणि के. के. मोहम्मद यांची नोकरी टिकून राहिली. ही आठवण खुद्द त्यांनीच पत्रकारांना सांगितली
After saying that the remains of the Ram Temple were found under the controversial Babri Dhakha, K. K. Mohammed’s job was in danger!!
महत्वाच्या बातम्या
- एआययूडीएफ प्रमुखांचा मुस्लिमांना 20 ते 26 जानेवारीपर्यंत प्रवास न करण्याचा सल्ला, भाजपचा पलटवार- अजमल-ओवैसींनी द्वेष पसरवला
- सदोष औषधे परत मागवल्याबद्दल ड्रग्ज अथॉरिटीला माहिती द्यावी लागेल; सरकारची कंपन्यांना सूचना- WHO स्टँडर्डनुसार टेस्ट करा
- खोटं बोलून, युती तोडून उद्धव ठाकरे टुणकन मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर; मुख्यमंत्री शिंदे “मिशन 48” मोहिमेवर!!
- गाझा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे, आता राहण्यायोग्य नाही