जाणून घ्या, आता कुठे झाल भूकंप आणि त्याची तीव्रता काय होती?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Myanmar भारताच्या शेजारील देश अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपामुळे लोकांना घराबाहेर पडावे लागले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या म्हणण्यानुसार, शनिवारी पहाटे ५:१६ वाजता अफगाणिस्तानात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.७ इतकी नोंदवण्यात आली.Myanmar
या भूकंपाचे केंद्र काबूलजवळ होते. अफगाणिस्तान व्यतिरिक्त, पाकिस्तानच्या अनेक भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. सध्या या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही, परंतु पहाटेच्या वेळी झालेल्या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शुक्रवारी, भारताच्या सीमेवर असलेल्या म्यानमारमध्ये एकामागून एक अनेक भूकंपाचे धक्के जाणवले. यातील सर्वात शक्तिशाली भूकंप ७.७ तीव्रतेचा होता. म्यानमारमधील भूकंपाचे केंद्र मंडाले शहराजवळ होते. या भूकंपामुळे म्यानमारमध्ये १४४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७३० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृतांचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढू शकतो. या भूकंपात म्यानमारमधील अनेक इमारती, पूल आणि धरणांचे नुकसान झाले आहे.
म्यानमारमधील या शक्तिशाली भूकंपाचा परिणाम थायलंडपर्यंत जाणवला. भूकंपामुळे थायलंडची राजधानी बँकॉकमध्येही बरेच नुकसान झाले आहे. येथे, बांधकाम सुरू असलेली इमारत काही वेळातच कोसळली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. भूकंपानंतर लोक उंच इमारतींमधून बाहेर पडताना आणि रस्त्यावर उभे राहताना दिसले. याशिवाय बांगलादेश आणि ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. शुक्रवारी मध्यरात्री म्यानमारमध्ये ४.२ तीव्रतेचा भूकंपही नोंदवण्यात आला.