• Download App
    ‘मॅकडोनाल्ड’ आणि ‘सबवे’ नंतर आता ‘बर्गर किंग’ देखील मेनूकार्ड मधून टोमॅटो गेले गायब! After McDonald and Subway now Burger King has also disappeared tomatoes from the menu card

    ‘मॅकडोनाल्ड’ आणि ‘सबवे’ नंतर आता ‘बर्गर किंग’ देखील मेनूकार्ड मधून टोमॅटो गेले गायब!

    ‘बर्गर किंग’ इंडियाच्यावतीने यामागील कारणही सांगण्यात आले आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : फास्ट-फूड चेन बर्गर किंगने आपल्या खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटो वापरणे बंद केले आहे. मॅकडोनाल्ड आणि सबवे नंतर, बर्गर किंग ही असा निर्णय घेणारी तिसरी फास्ट फूड कंपनी आहे. बर्गर किंग कडून रेस्टॉरंट ब्रँड्स एशियाद्वारे देशातील 400  स्टोअर चालवले जातात, त्यांच्या वेबसाइटवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की मेनूमधून टोमॅटो काढून टाकण्याची कारणे ‘गुणवत्ता आणि पुरवठा’ होती. After McDonald and Subway now Burger King has also disappeared tomatoes from the menu card

    रेस्टॉरंट ब्रँड एशिया लिमिटेडमध्ये, आमच्याकडे गुणवत्तेची उच्च मानके आहेत कारण आमचा वास्तविक आणि अस्सल खाद्यपदार्थ देण्यावर विश्वास आहे. टोमॅटो पिकाच्या गुणवत्तेवर आणि पुरवठ्याच्या बिकट परिस्थितीमुळे, आम्ही आमच्या पदार्थांमध्ये टोमॅटो वापरू शकत नाही. मात्र खात्री बाळगा, आमच्या खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटो लवकरच परततील. असं बर्गर किंगकडून सांगितलं आहे.

    बर्गर किंगने ग्राहकांना या परिस्थितीत “संयम आणि सामजस्य” ठेवण्याची विनंती केली आहे. या प्रसंगी, बर्गर किंग इंडियाच्या काही आऊटलेट्सनी काही विनोदासह एक नोटीस प्रकाशित केली आहे, ज्यात म्हटले आहे की, “टोमॅटोलाही सुट्टी हवी आहे… आम्ही आमच्या खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटोचा समावेश करण्यात असमर्थ आहोत.’’

    सरकार प्रथमच टोमॅटो आयात करत आहे –

    मुसळधार पावसामुळे पुरवठा विस्कळीत झाल्याने देशाच्या काही भागात टोमॅटोचा किरकोळ भाव २०० रुपये किलोपर्यंत आहे. यामुळे सरकारला प्रथमच टोमॅटोची आयात करावी लागली आहे. भारत सध्या नेपाळमधून टोमॅटो आयात करत आहे. गेल्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत माहिती दिली की देशांतर्गत बाजारात किमतीत विक्रमी वाढ होत असताना भारताने नेपाळमधून टोमॅटोची आयात सुरू केली आहे.

    After McDonald and Subway now Burger King has also disappeared tomatoes from the menu card

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त