• Download App
    कर्नाटकनंतर श्रीनगरच्या शाळेत हिजाबवरून वाद, मुस्लिम विद्यार्थिनींनी सुरू केले आंदोलन|After Karnataka controversy over hijab in Srinagar school, Muslim students start protest

    कर्नाटकनंतर श्रीनगरच्या शाळेत हिजाबवरून वाद, मुस्लिम विद्यार्थिनींनी सुरू केले आंदोलन

    विशेष प्रतिनिधी

    कर्नाटकानंतर आता हिजाबचा वाद जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचला आहे. श्रीनगरच्या रैनावरी भागात असलेल्या विश्व भारती महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी आरोप केला आहे की] त्यांना हिजाब घालण्यापासून रोखले जात आहे.After Karnataka controversy over hijab in Srinagar school, Muslim students start protest

    हिजाब हा आमच्या धर्माचा भाग आहे आणि आम्ही तो अजिबात हटवणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. इतर शाळांमध्ये लावण्याची परवानगी असताना आमच्या शाळेत का नाही? शाळा प्रशासनाच्या या आदेशाविरोधात विद्यार्थिनींनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.



    मुख्याध्यापक म्हणाले- शाळेच्या आत चेहरा उघडा ठेवण्यास सांगितले

    शाळेचे मुख्याध्यापक मीम रोज शफी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. या मुद्द्यावर काही गैरसमज निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या बाजूने विद्यार्थिनींना शाळेत तोंड उघडे ठेवण्यास सांगण्यात आले. कारण अनेक मुलींचा चेहरा पूर्णपणे झाकलेला असतो. शिक्षकांना विद्यार्थ्याची ओळख पटवणे अवघड आहे आणि काही प्रकरणांमध्ये अनेक मुले त्यांची प्रॉक्सी हजेरीदेखील दर्शवतात. यामुळे आम्ही शाळेच्या आत चेहरा झाकू नये असे सांगितले.

    हिजाब हा शाळेचा ड्रेसकोड आहे, तो परिधान करा

    मुख्याध्यापकांनी पुढे स्पष्ट केले की शाळेचा स्वतःचा ड्रेस कोड आहे. त्यात पांढऱ्या रंगाच्या हिजाबचाही समावेश आहे. पण अनेक मुली पांढऱ्या हिजाबऐवजी काळ्या किंवा वेगळ्या रंगाचे डिझायनर हिजाब घालून येतात. त्यांना सांगण्यात आले की जर हिजाब घालायचा असेल तर पांढरा परिधान करा, जो ड्रेस कोडमध्ये समाविष्ट आहे.

    After Karnataka controversy over hijab in Srinagar school, Muslim students start protest

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार