विशेष प्रतिनिधी
लखनौ: उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री ऑफिसमधून कानपूर घटनेच्या बाबतीत गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारींना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत. कानपूरमधील एका व्यापाऱ्याच्या गुढ मृत्यूला पोलिस जबाबदार असल्याच्या घटनेने विरोधकांनी निषेध नोंदवला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीचे आदेश दिले आहेत. या आदेशामध्ये पुढे म्हटले आहे की, ज्या अधिकाऱ्यांच्यावर असे आरोप असतील अशा अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या ठिकाणी नेमले जाणार नाही. अलीकडेच काही पोलीस अधिकारी व कर्मचारी बेकायदेशीर कृत्यामध्ये सामील असल्याचे आरोप होत आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. मुख्यमंत्री म्हणाले की, अशा व्यक्तींना पोलीस खात्यामध्ये जागा नाही. अशा व्यक्तींची पुराव्यासह यादी दिल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
After kanpur incident CM Yogi adityanath order dismissal of police officers
कानपूरमधील एक उद्योजक मनीष गुप्ता यांचा एका हॉटेलमधील पोलीस कारवाई मध्ये मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेश मधील गोरखपूर येथे ही घटना घडली होती. याप्रकरणी सहा पोलीस कर्मचारी बडतर्फ झाले आहेत. हॉटेलमध्ये टाकलेल्या धाडीवेळी सदर उद्योजक जखमी झाला होता आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यु झाला आहे असे गोरखपूरचे एस.पी. म्हणाले. पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये मनीष गुप्ता यांच्या चेहरा, डोके तसेच शरीराच्या इतर भागावर जखमा झाल्याचे आढळून आले.
मृत उद्योजकाच्या कुटुंबाकडून असा आरोप झाला आहे की, त्यांना पोलिसांनी मारहाण केल्याने मृत्यू आला आहे. मनीष गुप्तांच्या पत्नी मीनाक्षी म्हणाल्या की, माझ्या पतींना पोलिसांनी मारहाण केल्याने मृत्यू आला आहे. घटनास्थळी रक्त दिसत नसले तरी माझ्या पतींना रक्त येईतोपर्यंत मारहाण झाली आहे. त्या पुढे असे म्हणाल्या की, त्यांच्या दोन मित्रांनी सांगितले की त्या रूममध्ये रक्ताचा सडा पडला होता. पण हॉटेल मधील कर्मचाऱ्यांनी ते सर्व साफ केले आहे.
कुटुंबातील लोकांना मनीष यांच्या बेडखाली रक्ताने भिजलेला टॉवेल मिळाला. यावरून त्यांना मारहाण झाल्याचे स्पष्ट होते. मीनाक्षी गुप्ता म्हणाल्या की आमच्या तीन मागण्या आहेत. एक, सदर केस कानपूरला वर्ग करावी, दोन, पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी व राज्य सरकारने नोकरी द्यावी.
After kanpur incident CM Yogi adityanath order dismissal of police officers
महत्त्वाच्या बातम्या
- फ्रान्सचे माजी राष्ट्रपती सार्कोझी निवडणुकीत ‘अवैध पैसा’ वापरल्याप्रकरणी दोषी, न्यायालयाने सुनावली एक वर्षाची शिक्षा
- Bhawanipur Bypoll : भाजप नेत्याच्या कारवर हल्ला, तृणमूलवर तोडफोडीचे आरोप, बनावट मतदारांवरून गोंधळ, EC ने मागवला अहवाल
- Farmers Protest : शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे, म्हणाले – ‘महामार्ग कायमचे रोखू शकत नाहीत!’, केंद्राला निर्देश
- Amarinder Singh : कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेस सोडणार, पण भाजपमध्ये आताच प्रवेश नाही, काँग्रेस घसरणीला लागल्याची टीका
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जेल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात आमची लढाई , भुजबळ यांना पालकमंत्री पदावरून हटवा, शिवसेना आमदार सुहास कांदे यांची मागणी