विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते केरळचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यासाठी भाजपच्या वर्धापन दिनाचा मुहूर्त त्याने निवडला आहे. अनिल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबरोबर वेगवेगळ्या माध्यमांनी ज्या बातम्या दिल्या आहेत, त्यामध्ये अनिल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बीबीसीने केलेल्या डॉक्युमेंट्रीला विरोध केल्याचा ठळक उल्लेख केला आहे. त्याचबरोबर अनिल अँटनी यांच्या काँग्रेस मधील कामाचा उल्लेख केला आहे After joining BJP, Anil Antony meets party chief JP Nadda along with Union Minister V Muraleedharan
पण जे उल्लेख केलेले नाहीत ते जास्त महत्त्वाचे आहेत, ते म्हणजे अनिल अँटनी हे नेमके कुणाचे चिरंजीव आहेत आणि त्यांनी भाजपची वाट चोखाळताना नेमका कोणता निर्णय घेतला आहे?? त्याचे परिणाम काय होणार आहेत?? याचे फारसे उल्लेख माध्यमांमधल्या बातम्यांमध्ये आढळलेले नाहीत.
अनिल अँटनी ज्यांचे चिरंजीव आहेत, ते ए. के. अँटनी हे केवळ केरळचे मुख्यमंत्री अथवा माजी संरक्षण मंत्री एवढ्या पुरतेच कर्तृत्व असलेले मर्यादित नेते नाहीत. ते खऱ्या अर्थाने काँग्रेसचे “कॉन्शियस कीपर” आहेत. अँटनी यांनी नेहमी काँग्रेसनिष्ठा दाखवली. पण ते गांधी घराण्याच्या आहारी गेलेले फारसे गेले नाहीत किंवा बाकीच्या काँग्रेस नेत्यांप्रमाणे कोणतेही पद मिळवण्यासाठी रॅट रेसमध्ये शिरले नाहीत. अर्थात ए. के. अँटनी हे काही साधू संत नाहीत. त्यामुळे राजकारणासाठी जे विशिष्ट कौशल्य लागते आणि वेळ साधायला लागते ते कौशल्य निश्चित त्यांच्याकडे आहे. इतकेच नाही तर के. करुणाकरण यांच्या काळात ते केरळ काँग्रेसमध्ये आपला स्वतंत्र गट राखूनही होते. पण इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या काळातल्या काँग्रेसचे जे गांधी घराण्याच्या ध्रुवाभोवती फेऱ्या घालणारे जे नेते होते त्यात ए. के. अँटनी समावेश करता येणे कठीण आहे. ते बऱ्यापैकी स्वतःचा आब राखून राजकारण करत होते. ते आता वयपरत्वे राजकारणातून बाजूला झाले आहेत.
राजकीय भवितव्य भाजपमध्ये सुरक्षित
याच ए. के. अँटनी यांचे चिरंजीव अनिल आता भाजपमध्ये आले आहेत. अर्थातच ए. के. अँटनी यांना आपल्या चिरंजीवांचे राजकीय भवितव्य काँग्रेसमध्ये सुरक्षित दिसलेले नाही. हे त्याचे मुख्य कारण आहे. त्या उलट भाजपमध्ये सुरक्षित भविष्य शोधणे हे भाग पडल्यानेच अनिल अँटनींचा भाजप प्रवेश झाला आहे.
मग यात भाजपचा नेमका फायदा काय आहे??, तर तो सरळ सरळ केरळ मधल्या ख्रिश्चन रिच आऊट फायदा आहे. केरळ मध्ये भाजप प्रचंड संघर्षशील अवस्थेत आहे. एकीकडे फोफावणारा इस्लामी कट्टरवाद आणि त्याला प्रोत्साहन देणारे डावे सरकार, तर दुसरीकडे काँग्रेस या दोन संघटनांशी भाजपचा प्रचंड संघर्ष आहे. त्यांना तिथे या दोन राजकीय हत्तींच्या टकरीमध्ये स्वतःची पॉलिटिकल स्पेस निर्माण करायची आहे आणि यासाठी भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्याबरोबरच ख्रिश्चन रिच आऊट हा महत्त्वाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
केरळमध्ये लव्ह जिहाद हा मुद्दा जोरावरच आहे. लव्ह जिहाद प्रकरणांचा जो त्रास हिंदू समाजाला होतो, तोच त्रास ख्रिश्चन समाजाला होतो आहे. लव्ह जिहाद हा दोन समाजांमधला त्रासाचा कॉमन फॅक्टर आहे. इथे भाजपला ग्राउंड लेव्हलवर काम करताना अनिल अँटनी यांच्यासारख्या ख्रिश्चन नेत्याची उपयोग होऊ शकतो. भाजपला केरळमध्ये लगेच सत्तेवर येण्याची घाई नाही. तशी शक्यताही नाही. त्यामुळे भाजप स्टाईलने सोशल इंजिनिअरिंग करून पक्षाला मुख्य विरोधी पक्ष बनविणे हे निकटच्या भविष्यातले भाजपचे ध्येय आहे आणि त्या दृष्टीने अनिल अँटनींच्या भाजप प्रवेशाने एक पाऊल पुढे पडले आहे. अनिल अँटनीच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांमध्ये या महत्त्वाच्या घटकांचा उल्लेख इतर माध्यमांनी फारसा केलेला दिसत नाही, इतकेच!!
वायनाड पोटनिवडणुकीची शक्यता
देशातल्या सर्व मोदी समाजाला चोर ठरविल्याबद्दल सुरत कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा दिल्यानंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली त्यांनी या खासदारकी रद्द होण्याला वरच्या कोर्टात आव्हान दिले आहे पण त्याचा निकाल अद्याप लागायचा आहे तो जर राहुल गांधींना प्रतिकूल लागला तर वायनाड मध्ये पोटनिवडणूक होण्याची दाट शक्यता आहे अर्थातच भाजपला वायनाड मध्ये “अमेठी” घडविण्यात इंटरेस्ट आहे. त्यासाठी काही विशिष्ट तडजोडी करण्याचीही भाजपची तयारी आहे. पण त्याहीपेक्षा भाजपला केरळमध्ये त्यानिमित्ताने जो अत्यंत आक्रमक प्रचार करायचा आहे, त्यासाठी अनिल उपयोगी पडू शकतात, हा भाजप नेत्यांचा होरा आहे आणि त्यामध्ये जास्त तथ्य आहे!!
After joining BJP, Anil Antony meets party chief JP Nadda along with Union Minister V Muraleedharan
महत्वाच्या बातम्या
- आंतरधर्मीय विवाहावरून नंदुरबारमध्ये मध्यरात्री हिंसक संघर्ष; दगड-विटांचा मारा, पोलिस जखमी
- कर्नाटकच्या मंत्र्याला अल्पसंख्याकांविरोधात द्वेषपूर्ण भाषण करणे महागात, निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई
- PM मोदींनी मी चूक असल्याचे सिद्ध केले, भाजप सरकार पुरस्कार देईल असे वाटलेही नव्हते, पद्मश्री मिळाल्यानंतर शाह रशीद अहमद कादरी भावुक
- सुप्रीम कोर्ट : ईडी – सीबीआय तपासात पुढाऱ्यांना जन सामान्यांचाच न्याय; विरोधकांच्या “ऑक्सिजन” नळीवर पाय!!