• Download App
    अरुणाचल, अक्साई चीन वरून भारताला दमबाजी, पण भारताच्या सडेतोड उत्तरानंतर शी जिनपिंग यांचा g20 च्या बैठकीपासून पळ!! After India gave befitting reply on China's claims on arunachal and aksi chin, Xi jinping cancelled to attend g20 summit in India

    अरुणाचल, अक्साई चीन वरून भारताला दमबाजी, पण भारताच्या सडेतोड उत्तरानंतर शी जिनपिंग यांचा G20 च्या बैठकीपासून पळ!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन हे दोन भारताचे अधिकृत प्रदेश चीनने स्वतःच्या नकाशात दाखविले. भारताला त्यावरून चिनी कम्युनिस्ट सरकारने दमबाजी केली, पण भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिल्यानंतर मात्र चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांनी भारतात होणाऱ्या g20 शिखर परिषदेपासून पळ काढला आहे. शी जिनपिंग भारतात 8 सप्टेंबर रोजी होणाऱ्या g20 च्या शिखर परिषदेत सहभागी होणार नाहीत. त्यांच्या ऐवजी चीनचे पंतप्रधान ली क्वांग हे g20 परिषदेच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात येणार आहेत. अशी बातमी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. After India gave befitting reply on China’s claims on arunachal and aksi chin, Xi jinping cancelled to attend g20 summit in India

    जी 20 चे अध्यक्ष पद भारतात आल्यानंतर या परिषदेचा जागतिक पातळीवरचा बोलबाला खूप वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लोकप्रिय नेतृत्व, त्याभोवती असणारे वलय यामुळे भारताचा जागतिक पातळीवर प्रभाव वाढला आहे.

    पण जागतिक राजकारणाचे ताणेबाणे आणखी वेगळे आहेत. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारतात g20 शिखर परिषदेला येण्याबद्दल असमर्थता दाखविली आहे. अमेरिका आणि रशिया यांचे युक्रेन मुद्द्यांवर ताणलेले संबंध याची यासाठी मोठी पार्श्वभूमी आहे.

    पण त्यांच्या पाठोपाठ शी जिनपिंग यांनी देखील g20 शिखर परिषदेपासून पळ काढला आहे. पण त्याला चीनने भारताला केलेली दमबाजी आणि त्यानंतर भारताने त्या दमबाजीवर दिलेले सडेतोड प्रत्युत्तर याची पार्श्वभूमी आहे. पुतीन आणि शी जिनपिंग हे दोन कम्युनिस्ट देशांचे नेते जी 20 शिखर परिषदेत सामील होणार नसले, तरी अमेरिका आणि युरोप खंडातले सर्व राष्ट्राध्यक्ष अथवा पंतप्रधान या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीचे महत्त्व जसेच्या तसेच राहणार आहे.

    After India gave befitting reply on China’s claims on arunachal and aksi chin, Xi jinping cancelled to attend g20 summit in India

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते

    Judge Verma bench : जज वर्मा खंडपीठाच्या खटल्यांची पुन्हा सुनावणी होणार; 50 हून अधिक खटले प्रलंबित

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- अवमान याचिकेसाठी आमची आवश्यकता नाही; अॅटर्नी जनरलची परवानगी घ्या