जाणून घ्या, पहिली रिअॅक्शन काय होती?
विशेष प्रतिनिधी
भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने सोमवारी (20 मे 2024) पहिल्यांदा मतदान केले. भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच मतदान करण्याबाबत तो म्हणाला की, खूप छान वाटत आहे.After getting Indian citizenship Akshay Kumar voted for the first time
मुंबईत मतदान केल्यानंतर अक्षय कुमार म्हणाला, “भारताने विकसित आणि मजबूत राहावे अशी माझी इच्छा आहे. माझे मत यावर आधारित आहे. मतदान केंद्रावर मी वैयक्तिकरित्या सुमारे 500-600 लोक पाहिले आहेत. अशा परिस्थितीत मतदान चांगलेच होईल.
वास्तविक, अक्षय कुमारला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारतीय नागरिकत्व मिळाले होते. याआधी त्याच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व होते. सोशल मीडियावर नागरिकत्व प्रमाणपत्र शेअर करताना अक्षय कुमारने लिहिले होते की, हृदय आणि नागरिकत्व, दोन्ही हिंदुस्थानी आहेत. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे.
किती जागांवर होणार मतदान?
पाचव्या टप्प्यात आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 49 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. ज्या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे त्यामध्ये बिहार, जम्मू आणि काश्मीर, लडाख, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुका सात टप्प्यात होत आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी, दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिल रोजी, तिसऱ्या टप्प्यासाठी 7 मे रोजी आणि चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी मतदान झाले आहे.
After getting Indian citizenship Akshay Kumar voted for the first time
महत्वाच्या बातम्या
- निकोबारमध्ये पोहोचला मान्सून, 31 मे रोजी केरळमध्ये पोहोचेल; महाराष्ट्रात 9 ते 16 जूनदरम्यान एंट्री
- 1 – 40 – 125 : हे आकडे पाहा आणि काँग्रेस नेत्यांच्या “भविष्यवाण्या” वाचा!!
- संसदेची सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे बदलणार, CRPFची तुकडी आता कमांड सांभाळणार!
- पुंछमध्ये फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकू हल्ला, नॅशनल कॉन्फरन्सचे तीन कार्यकर्ते जखमी!