mehbooba mufti commented on taliban : अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार स्थापन झाल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनीही तालिबानी राग आळवला आहे. फारुख अब्दुल्ला यांच्यानंतर आता जम्मू -काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी कुलगाममध्ये सांगितले की, तालिबान वास्तव बनून समोर येत आहे. जर त्यांनी आपली प्रतिमा बदलली, तर जगासाठी ते एक उदाहरण बनू शकतात. after farooq abdullah now mehbooba mufti commented on taliban
विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार स्थापन झाल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनीही तालिबानी राग आळवला आहे. फारुख अब्दुल्ला यांच्यानंतर आता जम्मू -काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी कुलगाममध्ये सांगितले की, तालिबान वास्तव बनून समोर येत आहे. जर त्यांनी आपली प्रतिमा बदलली, तर जगासाठी ते एक उदाहरण बनू शकतात.
मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, तालिबान एक वास्तव म्हणून समोर येत आहे. त्यांची आधीची प्रतिमा मानवतेच्या विरोधात होती, परंतु यावेळी त्यांना अफगाणिस्तानात राज्य करायचे असेल तर ते खऱ्या शरियानुसार करावे. आपल्या कुराण शरीफमध्ये जे आहे, जे मुले आणि स्त्रियांचे हक्क आहेत. मदिनाचे जे मॉडेल आहे, त्याप्रमाणे शासन करावे. म्हणून जर त्यांनी खरोखर त्याची अंमलबजावणी केली असेल तर ते जगासाठी एक उदाहरण ठरू शकते. जर त्यांनी ते अंमलात आणले, तर जगातील देश त्यांच्याबरोबर व्यवसाय करू शकतील.
त्या पुढे म्हणाल्या की, खुदा ना खास्ता, जर त्यांनी गेल्या काही वर्षांतील त्यांच्या पद्धती सुरू ठेवल्या तर त्या संपूर्ण जगासाठीच नव्हे, तर अफगाणिस्तानच्या लोकांसाठीही कठीण होईल. मसरत आलम यांना हुर्रियतचा प्रमुख बनवण्याबाबत त्या म्हणाल्या की, हा त्यांचा आपसातील मुद्दा आहे. याशिवाय, त्या म्हणाल्या की, हे केंद्र बाहेरून लोकांना इथे आणते, परंतु आम्हाला येथे बंद ठेवले आहे. आम्हाला येथे धोका आहे, हे समजत नाही का?
फारुख अब्दुल्लांचेही वक्तव्य
श्रीनगर येथील एका कार्यक्रमात फारुख अब्दुल्ला म्हणाले की, तालिबानने इस्लामिक नियमांच्या आधारे अफगाणिस्तानवर राज्य केले पाहिजे, जगातील सर्व देशांशी चांगले संबंध प्रस्थापित केले पाहिजेत. फारुख अब्दुल्ला म्हणाले की, त्यांना आशा आहे की तालिबान प्रत्येकाला न्याय देईल.
after farooq abdullah now mehbooba mufti commented on taliban
महत्त्वाच्या बातम्या
- Modi Cabinet Decisions : मोदी मंत्रिमंडळाने गव्हासह 6 रब्बी पिकांवर MSP वाढवली, वाचा सविस्तर, कोणत्या पिकाचा काय आहे हमीभाव..
- PLI scheme for Textiles : केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, वस्त्रोद्योगासाठी PLI योजनेला मंजुरी, सरकारने रब्बी पिकांवर MSP वाढवली
- Mansukh Hiren Murder Case : अशी झाली होती मनसुख हिरेनची हत्या, संपूर्ण कथा एनआयएच्या आरोपपत्रात!
- NIA Charge sheet : प्रदीप शर्माने सुपारी घेऊन केली मनसुख हिरेनची हत्या, सचिन वाझेंनी दिली होती मोठी रक्कम- एनआयएचे आरोपपत्र
- योगायोग की षडयंत्र? : अफगाणिस्तानात तालिबानी राजवट सुरू होताच चीन- पाकिस्तानने भारताच्या सीमेवरील कमांडर बदलले