• Download App
    हाँ जी - ना जी; अंबिका सोनी यांच्या नकारानंतर पंजाबच्या मुख्यमंत्री पदासाठी सुखजिंदर सिंग रंधवा यांच्या नावाचा घोळ After discussion with the Punjab MLAs, AICC has proposed the name of Sukhjinder Randhawa for the post of CM

    हाँ जी – ना जी; अंबिका सोनी यांच्या नकारानंतर पंजाबच्या मुख्यमंत्री पदासाठी सुखजिंदर सिंग रंधवा यांच्या नावाचा घोळ

    वृत्तसंस्था

    चंडीगड : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून कॅप्टन अमरिंदरसिंग पायउतार झाल्यानंतर काँग्रेसला अद्याप नवीन मुख्यमंत्री नेमता आलेला नाही. उलट कॅप्टन अमरिंदरसिंग आणि त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातच जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. ते कोणी कोणासोबत शैय्यासोबत केली हे विचारण्या – सांगण्यापर्यंत खालच्या पातळीला येऊन पोहोचले आहे. After discussion with the Punjab MLAs, AICC has proposed the name of Sukhjinder Randhawa for the post of CM

    दरम्यानच्या काळात अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्री पद नाकारून झाले आहे. त्यानंतर पक्षाच्या निरीक्षकांनी काँग्रेसच्या 80 आमदारांकडून लेखी सूचना घेतल्या आहेत. त्यानुसार अनेक नावे पुढे आली आहेत. पण सुखजिंदर सिंग रंधावा यांचे नाव सर्वात पुढे आल्याचे सांगण्यात येत आहे. पण स्वतः सुखजिंदर सिंह रांधवा यांनी मात्र त्याचा इन्कार केला आहे. मी नक्की नाही, पण कोणीतरी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

     

    मात्र काँग्रेसमधील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सुखजिंदर सिंग रंधवा यांना काँग्रेस नेतृत्वाने मुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी पटविले आहे. आमदारांनी देखील त्यांच्या नावाला आता पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असे सांगण्यात येत आहे.

    यासंदर्भात काँग्रेसने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु अमरिंदरसिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात घमासान सुरू असताना सुखविंदर सिंग रंधवा यांचे नाव येते आणि ते स्वतः त्या नावाचा इन्कार करतात अशी चमत्कारिक राजकीय परिस्थिती पंजाबमध्ये उद्भवली आहे. आधी अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्रीपद नाकारले आणि आता सुखजिंदर सिंह रांधवा आपण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार नसल्याचे सांगत आहेत. यातून काँग्रेस श्रेष्ठींची चांगलीच पंचाईत झालेली दिसते.

    After discussion with the Punjab MLAs, AICC has proposed the name of Sukhjinder Randhawa for the post of CM

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!