या आधी आधी गृह मंत्रालयाला बॉम्ब स्फोटाच्या धमक्या असलेले ईमेल आले होते After Delhi Ahmedabad now comes the threat of bomb blast in three hotels of Bengaluru
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू: दिल्ली आणि अहमदाबादनंतर आता बंगळुरूमध्ये बॉम्बस्फोटाच्या ईमेलमुळे खळबळ उडाली आहे. बंगळुरूमधील तीन पंचतारांकित हॉटेलांना बॉम्बची धमकी मिळाली आहे. डीसीपी दक्षिण पूर्व बंगळुरू यांनी सांगितले की, तीन मोठी हॉटेल्स उडवून देण्याची धमकी देणारे ईमेल प्राप्त झाले आहेत. या हॉटेल्समध्ये ओटेराचाही समावेश आहे. या माहितीनंतर बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले असून शोधमोहीम सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईमेलची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी बॉम्ब शोधक आणि शोध पथके तैनात करण्यात आली आहेत. बंगळुरूमधील ज्या हॉटेलांना बॉम्बच्या धमकीचे ईमेल आले आहेत ती सर्व पंचतारांकित हॉटेल्स आहेत. याच्या एक दिवस आधी गृह मंत्रालयाला बॉम्बच्या धमक्या असलेले ईमेल आले होते. मात्र, नंतर ती बनावट धमकी असल्याचे सिद्ध झाले.
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितले की, ईमेलनंतर परिसराची चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, शहरातील तीन फाईव्ह स्टार हॉटेल्सना बॉम्बची धमकी मिळाली होती, मात्र तपासणीनंतर ती बनावट असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस सूत्रांनी सांगितले की, हॉटेल्सना ईमेल धमक्या मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम हाती घेण्यात आली. नंतर ही धमकी खोटी असल्याचे सिद्ध झाले.
After Delhi Ahmedabad now comes the threat of bomb blast in three hotels of Bengaluru
महत्वाच्या बातम्या
- अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, 4 आयसिस दहशतवादी पकडले, सर्व श्रीलंकेचे रहिवासी
- पीएम मोदी म्हणाले, भाजप अल्पसंख्याक विरोधात नाही; पण विशेष नागरिक कुणालाही मानणार नाही
- रईसींच्या निधनानंतर इराणमध्ये सत्तासंघर्षाचा धोका; धर्मगुरू अन् लष्करात वर्चस्ववाद उफाळण्याची शक्यता
- सगळी मिथके तोडून भाजप दक्षिणेतला सगळ्यात मोठा पक्ष ठरेल; पंतप्रधान मोदींना विश्वास!!