नाशिक : पराभवाच्या खाल्ल्यावर लाथा; INDI आघाडीच्या बैठकीत मारल्या मिठ्या!!, हेच चित्र आजच्या बैठकीतून समोर आले. ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधींना मिठी मारल्याचा फोटो व्हायरल झाला. Mamata and Sonia
– ममतांनी मारली सोनियांना मिठी
या त्याच ममता बॅनर्जी आहेत, ज्यांनी सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या काँग्रेसला पश्चिम बंगाल मध्ये आपल्या आघाडीत स्थान दिले नव्हते. काँग्रेसला स्वतंत्रपणे निवडणूक लढायला भाग पाडले होते. पण पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसला आणि काँग्रेसला जोरदार फटका बसला. दोन्ही पक्षांचा पराभव झाला. त्याबरोबर ममता बॅनर्जी “खाली” आल्या. मुकाट्याने इंडी आघाडीच्या बैठकीत सामील झाल्या. बैठकीत सामील झाल्याबरोबर सोनिया गांधींना मिठी मारून मोकळ्या झाल्या.
– ममतांच्या दिल्ली दौऱ्यात दोन खासदारांचे राजीनामे
पण ममता बॅनर्जींना हे राजकारण सहज सोपे गेले नाही. ते फारच जड गेले. कारण ममता बॅनर्जी एकीकडे “इंडी” आघाडीच्या बैठकीत असतानाच त्यांच्या तृणमूळ काँग्रेसचे राज्यसभेचे दोन खासदार सुखेंदू शेखर रॉय आणि कोयल मलिक यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्या दोघांनीही तृणमूळ काँग्रेस सोडली. त्यामुळे ममता बॅनर्जी इंडी आघाडीच्या बैठकीत सामील होऊन सुद्धा तृणमूल काँग्रेस मधली गळती थांबवू शकल्या नाहीत. सोनिया गांधींना मारलेली मिठी त्यांच्या उपयोगाची ठरली नाही. महत्त्वाचे म्हणजे तृणमूल काँग्रेसने सुखेंदू शेखर रॉय आणि कोयल मलिक या दोघांचीही एप्रिलमध्येच राज्यसभेवर पाठवणी केली होती. पण दोघांनीही पक्षातल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलून पूर्ण मूळ काँग्रेस सोडली. त्यासाठी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्याचा आणि “इंडी” आघाडीच्या बैठकीचा राजकीय मुहूर्त निवडला.
– “इंडी” आघाडीच्या एकजुटीची स्तुती
बाकी तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या दोन विधानसभांच्या निवडणुकीत विरोधकांनी जोरदार हापटी खाल्ल्यानंतर झालेल्या “इंडी” आघाडीच्या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षांच्या एकजुटीची स्तुती केली. मोदी सरकारने लोकसभेत मांडलेले महिला आरक्षण विधेयक पराभूत करण्यात “इंडी” आघाडी यशस्वी ठरली, अशी शाबासकी सगळ्यांना दिली. भविष्यात देखील मोदी सरकार आणणार असलेल्या वेगवेगळ्या देशविरोधी विधेयकांना विरोधकांनी एकजुटीने हाणून पाडले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्या नेत्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
– उद्धव मुंबईत, पवार बारामतीत
शरद पवार आणि उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित नव्हते उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित राहिल्याचे सांगितले गेले शरद पवारांनी आपल्या ऐवजी सुप्रिया सुळे यांना बैठकीला पाठविले. द्रविड मुन्नेत्र कळघम इंडी आघाडीतून बाहेर पडल्या विषयी शरद पवारांनी बारामतीतून चिंता आणि खंत व्यक्त केली. सगळ्या विरोधकांची समजूत काढून त्यांना परत “इंडी” आघाडीत आणायचे प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. उद्धव ठाकरे “इंडी” आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला गेले नाहीत, पण ते शर्मिला ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थावर गेले.
After defeat Mamata and Sonia came together
महत्वाच्या बातम्या
- INDI आघाडीच्या बैठकीत उद्या 23 पक्षांची बेरीज; पण मुख्य 3 घटकांच्या वजाबाकीने वाताहत!!
- Gautam Adani :गौतम अदानी पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; मुकेश अंबानींना मागे टाकत अव्वल स्थान
- राष्ट्रवादीच्या स्वाभिमानाची लक्तरे; रोहित पवारांपासून छगन भुजबळांच्या सगळेच विषय भाजपच्या फांदीला लटकलेले!
- Pure Edible Oil : खाद्यतेलाच्या पॅकेटवर आता ‘खरी माहिती’ द्यावी लागणार; सरकारचा मोठा निर्णय, 3 महिन्यांत नियम लागू