- भाजपाने नितीश कुमार सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.
विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमधील सरकारी शाळांमधील सुट्यांबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. विभागानुसार, सामान्य आणि उर्दू शाळांसाठी सुट्टीचे कॅलेंडर वेगळे आहे. सामान्य शाळांमध्ये हिंदू सणांना आणि उर्दू शाळांमध्ये ईद आणि बकरीदच्या दिवशी अतिरिक्त सुट्टीची तरतूद करण्यात आली असल्याचं सांगितलं आहेAfter criticism started over school holidays the Bihar Education Department clarified
महाशिवरात्री, वसंत पंचमी, जन्माष्टमी, रामनवमी आणि चित्रगुप्त पूजेला सर्वसाधारण शाळांना अतिरिक्त पाच सुट्या देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर उर्दू शाळांमध्ये ईद आणि बकरीदला प्रत्येकी तीन दिवस सुट्टी देण्याची तरतूद आहे.
विशेष म्हणजे सोमवारी सायंकाळी शिक्षण विभागाने शाळांना सुटी देण्याबाबत अधिसूचना जारी केली होती. नवीन कॅलेंडरनुसार जन्माष्टमी, रक्षाबंधन, रामनवमी, शिवरात्री, तीज, वसंत पंचमीच्या सुट्या कमी करण्यात आल्या आहेत, तर ईद आणि बकरीदच्या सुट्ट्या प्रत्येकी ३ दिवस करण्यात आल्या आहेत.
हे कॅलेंडर समोर आल्यानंतर भाजपने नितीशकुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. हिंदूंच्या सणांच्या सुट्या कमी करून मुस्लिमांच्या सणांच्या सुट्या वाढवल्याचा आरोप भाजपने केला आहे.
भाजप नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी नितीश सरकारला धारेवर धरले होते. ते म्हणाले की, नितीश कुमार यांनी हिंदूविरोधी मानसिकता असलेला आणि हिंदूंच्या भावना दुखावणारा निर्णय घेतला आहे. हिंदूंच्या सर्व सणांच्या सुट्ट्या रद्द करून मुस्लिम सणांच्या सुट्या वाढवण्यात आल्या. हे आम्ही कधीही मान्य करणार नाही.
After criticism started over school holidays the Bihar Education Department clarified
महत्वाच्या बातम्या
- संजय सिंह यांना तूर्तास जामीन नाही, पुढील सुनावणी 6 डिसेंबरला; दिल्ली कोर्टाची ईडीला नोटीस
- ‘तेलंगणात भाजपचा मुख्यमंत्री मागासवर्गीय असेल’, मतदानापूर्वी पीयूष गोयल यांचा विजयाचा दावा!
- उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांच्या यशस्वी सुटकेवर आनंद महिंद्रांचे खास ट्वीट, म्हणाले…
- Uttarkashi Tunnel Rescue : बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना सुखरुप बाहेर काढल्यानंतर मुख्यमंत्री धामींची मोठी घोषणा, म्हणाले…