• Download App
    'I-N-D-I-A' आघाडीने भोपाळमधील रॅली रद्द केल्यावर शिवराज सिंह चौहान यांनी लगावला टोला , म्हणाले... After canceling the rally in Bhopal by the INDIA front Shivraj Singh Chouhans reaction

    ‘I-N-D-I-A’ आघाडीने भोपाळमधील रॅली रद्द केल्यावर शिवराज सिंह चौहान यांनी लगावला टोला , म्हणाले…

    भोपाळमध्ये रॅली झाली तर काय होईल हे त्यांना माहीत होते, असंही शिवराज सिंह चौहान म्हणाले आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ :  ‘I-N-D-I-A’ आघाडीने आपली भोपाळमधील  रॅली रद्द केल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी टोला लगावला आहे.  ते घाबरले आहेत, म्हणून त्यांनी रॅली रद्द केली आहे. After canceling the rally in Bhopal by the INDIA front Shivraj Singh Chouhans reaction

    जनआशीर्वाद यात्रेदरम्यान माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, “जनतेचा रोष पाहून त्यांनी (INDI) रॅली रद्द केली. ‘सनातन धर्मा’च्या अपमानामुळे लोक संतप्त झाले आहेत. यावर सोनिया गांधी आणि राहुल गांधी गप्प आहेत, कमलनाथ आणि दिग्विजय सिंह देखील काही बोलत नाहीत. भोपाळमध्ये रॅली झाली तर काय होईल हे त्यांना माहीत होते. या भीतीने त्यांनी रॅली रद्द केली आहे.”

    मध्य प्रदेशात काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. कमलनाथ यांच्यासारखे अनेक काँग्रेस नेते निवडणुकीपूर्वी ‘कट्टर हिंदुत्वा’च्या मार्गावर आहेत. मात्र, सनातन धर्माच्या वादानंतर पेच निर्माण झालेल्या काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांची भोपाळमध्ये होणारी पहिली संयुक्त रॅली रद्द करण्यात आली आहे.

    मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले की, दोन डझनहून अधिक विरोधी पक्षांचा समावेश असलेली ‘I-N-D-I-A’ आघाडीची मध्य प्रदेशातील पहिली संयुक्त सार्वजनिक बैठक रद्द करण्यात आली आहे. राज्यातील इंडिया आघाडीच्या रॅलीबाबत विचारले असता कमलनाथ म्हणाले, ‘रॅली होणार नाही. ती रद्द करण्यात आली आहे.

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी