वृत्तसंस्था
लखनौ : उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या कायद्याचा दंडा असा काही चालला आहे की भल्या भल्या गँगस्टर माफियांची टरकली आहे. पण त्यातही आता बाहुबली नेता गँगस्टर माफिया अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांची ज्या प्रकारे पोलीस बंदोबस्तात भर रस्त्यात रात्री हत्या झाली, ती पाहून उत्तर प्रदेशातील बाकीच्या गॅंगस्टर माफियांची जास्तच टरकली आहे.After Atiq’s murder, Mukhtar Ansari’s scared
अतीक अहमद जसा गँगस्टर माफिया आणि बाहुबली नेता म्हणून आमदार – खासदार होता, तसाच पूर्वांचलातला बाहुबली नेता गँगस्टर माफिया मुख्तार अन्सारी याच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रीग प्रकरणात लखनऊ कोर्टात केस सुरू आहे आणि तो सध्या बांदा जेलमध्ये बंद आहे तेथून पोलीस बंदोबस्तात न्यायालयात सुनावणीसाठी यायला मुख्तार अन्सारीने नकार दिला आहे. उलट आपल्याला जीविताचा धोका वाटत असल्याचे त्याने न्यायालयाला सांगितले आहे.
मनी लॉन्ड्रीग केस मध्ये मुख्तार अन्सारीची लखनऊ न्यायालयात ऑनलाइन सुनावणी होणार होती. पण तांत्रिक कारणामुळे ती रद्द झाली आणि पोलिसांनी मुख्तारला प्रत्यक्ष सुनावणीसाठी नेण्याची तयारी केली होती. पण मुख्तार आता एवढा घाबरला आहे की त्याने पोलीस बंदोबस्तात देखील बांदा जेलमधून लखनऊ न्यायालयात जायला नकार दिला आणि आपल्या जीविताला धोका असल्याचा न्यायालय पुढे कांगावा केला आहे.
पूर्वांचलातला माफिया नेता
हाच तो मुख्तार अन्सारी आहे, जो चार वेळा मढ मतदारसंघातून आपल्या बाहूबलावर बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष या पक्षांची तिकिटे घेऊन आमदार झाला होता. खंडणी, जमिनी लाटणे, बलात्कार, माफियागिरी, शस्त्रांची तस्करी असे अनेक गुन्हे त्याच्यावर आणि त्याच्या गॅंगवर आहेत. सध्या मनी लॉन्ड्रीग केस मध्ये तो बांदा जेलमध्ये बंद आहे.
यापूर्वी पंजाब मध्ये काँग्रेसचे सरकार असताना तो तिथल्या लुधियाना जेलमध्ये बंद होता आणि त्याला तेथे सुरक्षित वाटत होते. परंतु कोर्टाच्या आदेशानंतर त्याला उत्तर प्रदेशच्या बांदा जेलमध्ये आणून बंद करण्यात आले आहे. अतीकच्या हत्येनंतर मुख्तार अन्सारीला आता स्वतःच्या जीवाची भीती वाटत आहे.
After Atiq’s murder, Mukhtar Ansari’s scared
महत्वाच्या बातम्या
- ओलांडली चीनची लोकसंख्या; भारतात वाजली धोक्याची घंटा; पण भारतात कुणाची लोकसंख्या वाढतीय??
- Karnataka Election : भाजपाने जाहीर केली ४० स्टार प्रचारकांची यादी; पंतप्रधान मोदी, अमित शाह, नड्डा, राजनाथ सिंह यांची नावं आघाडीवर!
- माफिया अतिक अहमदचा खास शूटर असद कालियाला अटक, ५० हजारांचा होता इनाम!
- WATCH : केजरीवालांनी स्वत:चे गुरू अण्णा हजारेंची रुग्णालयात हत्या करण्याचा प्रयत्न केला होता, कपिल मिश्रा यांचा खळबळजनक आरोप