• Download App
    After Ajit Dada, Bhujbal's political beating too

    पवार लोकप्रिय, पण राष्ट्रवादी 50 – 60 आमदारांच्या पुढे गेली नाही; अजितदादांनंतर भुजबळांचीही राजकीय फटकेबाजी

    प्रतिनिधी

    नाशिक : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्या पदाऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस मधले संघटनात्मक पद मागितले. त्यानंतर राष्ट्रवादीतल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली. छगन भुजबळ यांच्या वक्तव्याच्या रूपाने ही अस्वस्थता बाहेर आली. पण त्याच वेळी छगन भुजबळ यांनी अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात काढलेल्या उद्गारांना आजच्या पत्रकार परिषदेत दुजोराही दिला आहे. After Ajit Dada, Bhujbal’s political beating too

    अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शरद पवारांच्या नेतृत्वाची तुलना ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, चंद्राबाबू नायडू, जगन मोहन रेड्डी यांच्याशी करून त्या सर्व नेत्यांनी आपापल्या राज्यां मध्ये स्वबळावर सत्ता आणून दाखवली, पण शरद पवारांचे नेतृत्व त्यांच्यापेक्षा उजवे असून देखील राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणता आली नाही, असे वक्तव्य केले होते. छगन भुजबळ यांनी आजच्या पत्रकार परिषदेत त्याच वक्तव्याची री ओढली. शरद पवार महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय नेते आहेत, पण राष्ट्रवादी कधीच 50 – 60 आमदारांच्या पेक्षा जास्त आमदार निवडून आणू शकली नाही, अशी खंत छगन भुजबळ यांनी बोलून दाखविली.


    अमेरिकेतील शिकागोत आज उलगडणार पत्रकार सावरकर; अभ्यासक देवेंद्र भुजबळांचे व्याख्यान


    28 जूनला राष्ट्रवादीची कार्यकारिणी बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत होणार आहे. पक्षातील विविध संघटनात्मक बदलाबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. यात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता आहे.

    विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतंच आपल्याला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी जबाबदारी द्या, अशी मागणी केली. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष होऊन 5 वर्ष 1 महिन्याचा कालावधी उलटला आहे, याची आठवण करून दिली. वास्तविक पक्षाच्या घटनेनुसार तीन वर्षांनी प्रदेशाध्यक्ष बदलणे अपेक्षित असते. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी इतर नेत्याकडे जाऊ शकते. याबाबतच्या चर्चा सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील ओबीसी समाजाला प्रदेशाध्यक्षपद मिळावे, असे म्हणत प्रदेशाध्यक्ष पदाबाबतची इच्छा व्यक्त केली. भुजबळांच्या वक्तव्यानंतर विविध चर्चांना उधाण आले. भुजबळ यांनाही प्रदेशाध्यक्षपद हवे, अशी चर्चा रंगली. आज छगन भुजबळ यांनी आपल्या वक्तव्यावर आज स्पष्टीकरण दिले.

    छगन भुजबळ म्हणाले :

    • सर्वच पक्षांमध्ये दर 3-5 वर्षांनी पक्षांतर्गत निवडणुका होत असतात. अजितदादांनी सर्वांसमोर इच्छा प्रदर्शित केली. लोकं म्हणतात अजित पवार विरोधी पक्षनेते म्हणून इफेक्टिव्ह काम करत नाहीत. मग मी त्यांची गचंडी धरू का? असे अजित पवार म्हणाले. मी सुद्धा दादांसोबत भांडायला असतो.
    • 2 महत्वाची पदेही पक्षात असतात. त्यात विधानसभेतील प्रमुख आणि पक्षातील प्रांतप्रमुख. एका मोठ्या समाजाकडे जर एक महत्वाचे पद दिले, तर दुसऱ्या छोट्या समाजाकडे दुसरं पद द्यायला हवं. ही पवारांची परंपरा होती. मी तीच अपेक्षा व्यक्त केली.
    • राष्ट्रवादी स्थापन झाल्यावर काँग्रेस फुटली असे भाजपला वाटून त्यांनी एकत्र निवडणुका घेतल्या. पण जनतेने काँग्रेस आणि आम्हाला कौल दिला. मी उपमुख्यमंत्री असताना बबनराव पाचपुते यांना प्रदेशाध्यक्ष केले. पण पुढे बदल होत गेला. भाजपमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट सुद्धा नाकारले. पण ते ओबीसी असल्याने त्यांना प्रदेशाध्यक्ष केले
    • ‘शरद पवार सर्वात लोकप्रिय नेते, तरी 50-60 जागांच्या वर जाऊ शकलो नाही’
    • काँग्रेसने कुणबी समाजाचे नाना पटोले यांना अध्यक्ष केले. शिवसेनेत राऊत हे ओबीसी आहेत. आमच्याकडे असलेला ओबीसी समाज हा भाजपमध्ये गेला. अजितदादांनी सांगितले, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेकांनी एकट्याच्या जीवावर राज्य मिळवले. पण शरद पवार सर्वात लोकप्रिय नेते असतांना आपण 50-60 जागांच्या वर जाऊ शकलो नाही.
    • जास्तीत जास्त समाजाला आपण आकर्षित करू शकलो तर आपल्याला मत जास्त भेटतील. ओबीसी समाजाचा कोणीतरी एकाला मोठ्या पदावर द्या. जितेंद्र आव्हाड, धनंजय मुडे, सुनील तटकरे आहेत. जर कोणी नाही झाले, तर छगन भुजबळ आहे, असं मी म्हंटलं. वर्तमान पत्रात आलं की,मला व्हाययचे पण असं नाही. छोट्या समाजाला पद द्या, असे मी म्हटले.
    • एका समाजाची छाप आपण जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत इतर मतदार आपल्याकडे येणार नाही. इतर पक्ष जर याचा विचार करतात तर आपणही करायला हवा. शरद पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. पण आम्ही सूचना करत असतो. काँग्रेसने सुद्धा मुंबईत दलित समाजाची भगिनी अध्यक्ष केली. त्यामागे काही उद्देश आहे. कारण त्या समाजाला आकर्षित करत असतात.
    • अजित पवारांचा गट वगैरे नाही. शरद पवार हाच आमचा गट आहे. अजित पवारांनी सूचना केली आहे. शरद पवार यांच्या म्हणण्याच्या एक इंच सुद्धा अजित पवार पुढे जात नाहीत.
    • ओबीसी समाजाला मोठे पद मिळाले तर निश्चित फायदा होईल. शरद पवारांनी सांगितलेले काम आम्ही आमच्या अनुभवाप्रमाणे करत असतो. प्रदेशाध्यक्षपद मला मिळाले तरी प्रॉब्लेम नाही. पण मी अडून बसलेलो नाही. पक्षाची प्रतिमा सुधारवायची आवश्यकता असेल तर इतर छोट्या समाजाला पद द्यावे, असे माझे मत आहे. आतल्या आत इतर पक्ष सुद्धा आमच्या विरोधात प्रचार करत असतात. त्यामुळे माझे मत ऐकल्यास राष्ट्रवादीला निश्चित फायदा होईल.

    After Ajit Dada, Bhujbal’s political beating too

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!