• Download App
    आफताबने प्लॅनिंग करूनच श्रद्धाची केली हत्या आणि 35 तुकडे; नार्को टेस्टमधून अनेक धक्कादायक खुलासे Aftab killed Shraddha by planning and 35 pieces

    आफताबने प्लॅनिंग करूनच श्रद्धाची केली हत्या आणि 35 तुकडे; नार्को टेस्टमधून अनेक धक्कादायक खुलासे

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : लव्ह जिहाद मधून आफताब अमीन पूनावालाने लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या केल्यानंतर आधी आफताबच्या पॉलिग्राफ टेस्टमधून मोठे खुलासे झाले. त्यानंतर आफताबची नार्को टेस्ट करण्यात आली असून या टेस्टमध्ये आफताबने अनेक प्रश्नांची उत्तरे देऊन त्यापुढचे धक्कादायक खुलासे केले आहेत. दिल्लीतील रोहिणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये एफएसएलच्या तज्ज्ञ पथकाने आफताबची नार्को टेस्ट केली आहे. पॉलिग्राफ चाचणीमध्ये आफताबने अनेक उत्तरे टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्या नार्को टेस्ट केली. त्यातूनच अनेक खुलासे झाले आहेत. Aftab killed Shraddha by planning and 35 pieces

    नार्को टेस्टमध्ये कबुली 

    नार्को टेस्ट दरम्यान आफताबने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली आहेच. पण श्रद्धाची हत्या केल्यावर तिचा मोबाईल, हाडे आणि कपडे नेमके कुठे फेकले? या प्रश्नांची उत्तरे आफताबने दिली आहेत. आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे, करण्यासाठी कोणते शस्त्र वापरले याचा खुलासा सुद्धा त्याने केला आहे.



    रागाच्या भरात आफताब याने श्रद्धाची हत्या केल्याची थिअरी त्याच्याच कबुली जबाबावरून आधी मांडली जात होती. परंतु, पॉलिग्राफ टेस्टमध्ये आफताब याने श्रद्धाच्या हत्येचा कोणताही पश्चाताप होत नसल्याचे सांगितले. शिवाय आपल्याला जन्नत मध्ये हूर मिळणार आहे, असे तो म्हणाला. यातून त्याची इस्लामी जिहादी मानसिकता स्पष्ट झाली. परंतु, श्रद्धाच्या मृतदेहाची हाडे आणि मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरलेली हत्यारे याविषयी आफताब आधी माहिती देत नव्हता, ती माहिती आता त्याने नार्को टेस्टमध्ये दिली आहे. त्यामुळे ही केस कायदेशीर दृष्ट्या मजबुतीने पुढे सरकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

    श्रद्धाचे वालकरच्या वडिलांचे सुद्धा आफताबसोबत अनेकदा खटके उडाले आहेत. श्रद्धाची हत्या करणारा आफताब माणिकपूर पोलिसांनी उशिरा तक्रार दाखल केल्यामुळे उजळ माथ्याने वावरत राहिला, असा आरोप श्रद्धाच्या चुलत भावाने केला आहे.

    झोमॅटो डिलिव्हरीच्या तारखांमुळे मोठा ट्विस्ट

    झोमॅटो फूड डिलिव्हरी अ‍ॅपद्वारे आफताबच्या फोनवरून फूड ऑर्डर केल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या तारखांनुसार १८ मे पूर्वी आफताब दोन लोकांसाठी जेवण ऑर्डर करत होता, तर त्यानंतर आफताब फक्त एका व्यक्तीसाठी जेवण ऑर्डर करत होता. आफताब मुद्दामच वेगवेगळ्या अ‍ॅप्सवरून जेवण मागवत होता. मे महिन्याच्या अखेरीस त्याने ऑनलाईन जेवण ऑर्डर करण्याचे प्रमाण कमी केले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

    Aftab killed Shraddha by planning and 35 pieces

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र