• Download App
    BOYCOTTSonyTV ट्रेंड सुरू; आफताब लव्ह जिहाद केस झाकण्याचा क्राईम पेट्रोलमध्ये प्रयत्न AFTAB BECOMES MIHIR AND SHRADDHA BECOMES ANA FERNANDEZ. THIS IS HOW AGENDA IS SPINNED ON SONY TV CRIME PATROL

    #BOYCOTTSonyTV ट्रेंड सुरू; आफताब लव्ह जिहाद केस झाकण्याचा क्राईम पेट्रोलमध्ये प्रयत्न

    प्रतिनिधी

    मुंबई : धर्मांध आफताब अमीन पूनावाला याने लव्ह जिहाद मधून हिंदू युवती श्रद्धा वालकर हिच्या शरीराचे ३५ तुकडे करून तिची निर्घृण हत्या केली. आता या घटनेवर सोनी टीव्हीच्या क्राईम पेट्रोल या मालिकेत श्रद्धा मर्डर केसवर विशेष भाग बनवण्यात आला. त्यामध्ये मात्र धक्कादायक बदल करण्यात आला आहे. त्यामध्ये आरोपी आफताब याचे मिहिर असे नाव देऊन हिंदू दाखवण्यात आले आहे, तर श्रद्धाचे नाव ऍना फर्नांडिस असे ख्रिश्चन दाखवण्यात आले आहे. AFTAB BECOMES MIHIR AND SHRADDHA BECOMES ANA FERNANDEZ. THIS IS HOW AGENDA IS SPINNED ON SONY TV CRIME PATROL

    यामध्ये अफताबला जाणीवपूर्वक मुसलमान दाखवण्यात आले नाही, यामुळे सोशल मीडियात प्रचंड संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याचे थेट संबंध आता सोनी वाहिनीचे बिझनेस हेड दानिश खान यांच्याशी जोडण्यात आले आहेत. दानिश खान हे मुसलमान असल्याने त्यांनी हा खोडसाळपणा केला असल्याचा आरोप नेटकरी करू लागले आहेत, तसेच #BOYCOTTSonyTV हे ट्रेंड सुरू झाला आहे.

    • क्राइम पेट्रोल में दिखाया गया श्रद्धा हत्याकांड पर एपिसोड
    • श्रद्धा को बना दिया ईसाई और आफताब को बना दिया योग शिक्षक मिहिर
    • अर्थात हिंदू योग शिक्षक ने ईसाई प्रेमिका के टुकड़े किए

    कला की स्वतंत्रता के नाम पर हिंदू विरोधी एजेंडा कबतक? ट्रेंड कर रहा #BOYCOTTBOLLYWOOD#BOYCOTTSONYTVPIC.TWITTER.COM/TYI0B97G5O

    — SUDARSHAN NEWS (@SUDARSHANNEWSTV) JANUARY 1, 2023

    काय दाखवले आहे एपिसोडमध्ये?

    दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. यात धर्मांध मुसलमान युवक आफताब पूनावालावर श्रद्धाच्या हत्येचा आरोप आहे. आरोपीने श्रद्धाचे 35 तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. याप्रकरणी पोलिसांचा तपास अद्याप सुरुच आहे. दरम्यान, सोनी टीव्हीच्या क्राईम पेट्रोल शोमध्ये अहमदाबाद-पुणे मर्डर नावाचा एपिसोड प्रसारित झाला आहे. हे आफताब आणि श्रद्धाच्या कथेचे नाट्यमय रुपांतर असल्याचा दावा केला जात आहे. हा भाग प्रसारित केल्यानंतर शो वादात सापडला आहे.

    #BOYCOTTSONYTVPIC.TWITTER.COM/UJJEIEZI7G

    — VIVEK AWASTHI (@VIVEKAWASTHI89) JANUARY 1, 2023

    #BOYCOTTSonyTV ट्विटरवर ट्रेंड करत आहे. शोच्या व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याप्रसारित भागांच्या अनेक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. शोमध्ये श्रद्धा आणि आफताबचा धर्म बदलण्यात आल्याचे लोकांचे म्हणणे आहे. श्रद्धा ही अॅना फर्नांडिस या ख्रिश्चन मुलीच्या भूमिकेत आहे, तर तिला मारणारा आफताब मिहिर नावाचा हिंदू तरुण दाखवला आहे. तसेच तो व्यवसायाने योगा शिक्षक दाखवण्यात आला आहे.

    AFTAB BECOMES MIHIR AND SHRADDHA BECOMES ANA FERNANDEZ.
    THIS IS HOW AGENDA IS SPINNED ON SONY TV CRIME PATROL👇👇#BOYCOTTSONYTV#BOYCOTTBOLLYWOODPIC.TWITTER.COM/RYD1OMGQUB

    — VISHIOUS🏴‍☠️ (@SANGHIIIIIDAMN) DECEMBER 31, 2022

    एपिसोडमध्ये मिहिरची आई एक धार्मिक स्त्री आहे, जी मंदिरात जाऊन पूजा करते. नंतर, मिहीर आणि अॅना एका मंदिरात लग्न करतात आणि पुण्याला शिफ्ट होतात. तर श्रद्धा आणि आफताब दिल्लीत लिव्ह इनमध्ये राहत होते. लग्नानंतर मिहीर अॅनाशी भांडू लागतो. एके दिवशी भांडण झाल्यावर मिहिर अॅनाला मारतो, तो अॅनाचा मृतदेह बाथरूममध्ये घेऊन जातो आणि धारदार शस्त्राने तिचे तुकडे करुन रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो. मृत शरीराचे तुकडे ठेवलेल्या फ्रीजमधून मिहीर पाणी काढतो आणि त्याला काही फरक पडत नसल्याप्रमाणे पितो. असाच प्रकार श्रद्धाच्या बाबतीतही झाला आहे. त्यामुळे शोवर लोक नाराज झाले. हा एपिसोड 27 डिसेंबरला दाखवण्यात आला होता. या शोमध्ये हिंदू धर्माला लक्ष्य करण्यात आल्याचे ट्विटरवरील यूजर्सचे म्हणणे आहे.

    AFTAB KILLED SHRADDHA. BUT SEE, WHAT SHOWING #SONYTV

    AFTAB BECOMES MIHIR AND SHRADDHA BECOMES ANA FERNANDEZ.
    THIS IS URDUWOOD AGENDA TO BLAMED HINDU’S.👇👇#BOYCOTTSONYTV#BOYCOTTBOLLYWOODPIC.TWITTER.COM/DWDVN4NUHQ

    — SHASHIKANTA SAHOO (@SHASHIK40983107) JANUARY 1, 2023

    AFTAB BECOMES MIHIR AND SHRADDHA BECOMES ANA FERNANDEZ. THIS IS HOW AGENDA IS SPINNED ON SONY TV CRIME PATROL

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!