वृत्तसंस्था
केपटाउन : कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटवर आफ्रिकी आणि पश्चिजम देशात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आफ्रिकी देश मलावीचे अध्यक्ष लजारुस चकवेरा यांनी अमेरिका, ब्रिटन आणि युरोपिय देशांवर एफ्रोफोबिया झाल्याचा आरोप केला आहे. पश्चिमी देशांवर ते चांगलेच भडकले आहेत. African Countries targets USA
दक्षिण आफ्रिकेवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे चकवेरा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत शास्त्रानुसार निर्णय घेतले जात नाहीत. फेसबुक पोस्टवर ते म्हणाले, की ओमिक्रॉन व्हेरिएंट शोधल्याबद्धल जगाने आफ्रिकी संशोधकांचे आभार मानले पाहिजे. याउलट आमच्यावरच बंदी घातली जात आहे.
अमेरिका, युरोप, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाकडून चुकीचे पावले उचलली जात आहेत. नव्या व्हेरिएंटवर नियमानुसार आणि शास्त्रानुसार निर्णय घ्यायला हवेत. यासाठी एफ्रोफोबिया पीडित होण्याची गरज नाही, अशा शब्दात टीका केली आहे.
African Countries targets USA
महत्त्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरूच ; अनिल परब यांनी दिली महत्वाची माहिती
- गोरगरीबांसाठीच्या उज्वला योजनेतही माध्यमाकडून राजकारण, मोदी सरकारने २०१९ पूर्वीच बहुतांश गरजुंपर्यंत पोहोचण्याचा केला प्रयत्न
- पोलीसच बनले वऱ्हाडी, पळून गेलेल्या युवक-युवतीचा पोलीस ठाण्यातच लावला विवाह
- मुख्यमंत्रिपदाच्या नादात शिवसेना संपत चालली, चंद्रकांत पाटील यांचा आरोप