• Download App
    Afghan economic condition worsened

    अफगाणमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसह हजारो निदर्शक वेतनासाठी बँकांच्या बाहेर, आर्थिक संकटाने अफगणिस्तान कोलमडणार

    वृत्तसंस्था

    काबूल : काबूलमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसह हजारो निदर्शक बँकांच्या बाहेर जमा होत आहेत. त्यांना गेले सहा महिने वेतनच मिळालेले नाही. तसेच, अनेक एटीएम केंद्रांच्या बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगाही लागलेल्या आहेत. एटीएम मशिन सुरु असल्या तरी २४ तासांत केवळ काही निवडक पैसे काढण्यासच परवानगी देण्यात आली आहे. Afghan economic condition worsened



    अफगाणिस्तानचा कारभार अनेक वर्षे विदेशी मदतीच्या आधारावरच चालत होता. त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये ७५ टक्के वाटा अशा मदतीचाच होता. सर्व देशांशी चांगले संबंध हवे आहेत आणि इस्लामिक कायद्याची फारशी कडक अंमलबजावणी करणार नाही, असे आश्वािसन तालिबानने दिले असले तरी त्यांच्यावर स्थानिक जनतेचा किंवा इतर देशांचा विश्वातस नाही. बहुतांश देशांनी तालिबानी राजवटीला मदत करण्यास नकार दिल्याने सामान्य अफगाणी नागरिकाला आर्थिक संकटालाही सामोरे जावे लागत आहे.

    अफगाणिस्तान सरकारकडे ९ अब्ज डॉलरची गंगाजळी आहे. मात्र, त्यावर अमेरिकेचे नियंत्रण आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही ४५ कोटी अमेरिकी डॉलरची मदत रोखून धरली आहे. विदेशाकडून येणाऱ्या मदतीचा ओघ आटल्याने स्थानिक चलनाचा दर कोसळून दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतीही गगनाला भिडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    Afghan economic condition worsened

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!