वृत्तसंस्था
व़ॉशिंग्टन : अफगाणिस्तानमध्ये शांतता निर्माण होऊन विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने अमेरिकेने गेल्या वीस वर्षांमध्ये अफगाण नागरिकांचा एक डिजीटल डेटाबेस तयार केला होता. मात्र, तालिबानने अत्यंत वेगाने देशाचा ताबा मिळविल्यानंतर लाखो डॉलर खर्च करून तयार केलेला हा डेटाबेस त्यांच्या ताब्यात गेला आहे. त्यामुळे विकास होण्याऐवजी जनतेवर लक्ष ठेवण्यासाठीच या माहितीचा वापर केला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. Afghan database is in hands of Taliban now
अमेरिकेने बरेच प्रयत्न करून अफगाणिस्तानमधील जनतेची माहिती गोळा केली होती. देशात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण व्हावी आणि सरकारसह सर्वांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, हादेखील त्यामागील उद्देश होता. शिवाय, या डेटाबेसचा प्रभावी वापर करून शिक्षण, महिला सबलीकरण, भ्रष्टाचाराला विररोध, स्थिर लोकशाही यांना बळ देता येणे शक्य होते.
तालिबानकडून मात्र जनतेवर हेरगिरी करण्यासाठी, समाजावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि विरोधकांना शासन करण्यासाठी त्याचा वापर होण्याची शक्यता आहे.
तालिबानने १५ ऑगस्टला काबूलचा पाडाव केल्यानंतर ही यंत्रणा त्यांच्या ताब्यात गेली आहे. या यंत्रणेचा वापरही तालिबान्यांनी त्यांच्या उपयोगासाठी सुरु केला असल्याचे काही उदाहरणांवरून दिसून येत आहे. अनेक नागरिकांना धमकीचे फोन येत आहेत. काहींना व्हॉट्सॲपवरही अज्ञात क्रमांकावरून संदेश येत आहेत. अफगाणिस्तान सरकारतर्फे तालिबानविरोधात लढलेल्या सुमारे ७ लाख सैनिकांचीही माहितीही या डेटाबेसमध्ये आहे.
Afghan database is in hands of Taliban now
महत्त्वाच्या बातम्या
- नांदेड एक झलक होती, सरकार दखल घेत नसेल तर आम्हाला करायचं ते आम्ही करू शकतो, संभाजीराजे छत्रपती यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
- कापड उद्योगाला प्रोत्साहनासाठी केंद्र सरकार देणार १०,६३३ कोटी रुपयांचे अनुदान
- सुरक्षा समितीची (सीसीएस) महत्त्वपूर्ण बैठक : चीन-पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी मोदी सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
- खासदार सुभाष भामरे यांना जाणवला चिकुन गुनियाचा त्रास , वायू सेनेच्या विमानाने मुंबईला हलवले