वृत्तसंस्था
सहारनपुर : इस्लाम मध्ये एक मुश्त म्हणजे मुठभर दाढी सुन्नत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जर दाढी काढली तर त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल, असा अजब फतवा दारूल उलूमने 20 फेब्रुवारी 2023 ला काढला आहे. इस्लाम मध्ये शरिया आणि सुन्नत यानुसार सगळ्यांनी जीवन व्यवहार करण्याचा आदेश अल्लाहने दिला आहे. त्यानुसारच नियम पाळले जातील अन्यथा विद्यार्थ्यांना बाहेर काढले जाईल, असे या फतव्यामध्ये नमूद केले आहे. सर्व इस्लामी शिक्षण संस्थांमध्ये ही नियमावली काटेकोरपणे टाळण्याचे आदेशही दारूल उलूमने दिले आहेत. Admission of students will be canceled if the beard is removed
दारूल उलनच्या शिक्षण विभागाचे प्रमुख मौलाना हुसेन अहमद हरिद्वारी यांनी या फतव्याचे समर्थन करताना हीच खरी इस्लामी शिक्षण पद्धती असल्याचे नमूद केले आहे. जो विद्यार्थी इस्लामच्या नियमानुसार मुठभर दाढी राखणार नाही अथवा दाढी कापेल तो विद्यार्थी कोणत्याही वर्षाचा असला तरी त्याला त्याचे नाव दारूल उलूम मधून काढून टाकण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांनी दाढी राखली नाही त्यांचे ऍडमिशन फॉर्मही स्वीकारले जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
याआधी चार विद्यार्थ्यांवर त्यांनी दाढी काढल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आपण दाढी परत राखू, असे लेखी पत्र या विद्यार्थ्यांनी दारूल उलूमच्या शिक्षण विभागाला दिले. परंतु त्यांना शिक्षण संस्थेत फेरप्रवेश देण्यात आला नाही.
विद्यार्थ्यांनी मुठभर दाढी ठेवावी हे दारूल उलूमने काढलेले एकमेव फर्मान नाही. या आधी इस्लामी जीवनपद्धतीनुसार अनेक फर्माने काढली आहेत. यामध्ये फोटो काढण्यास मनाई, कंडोम वापरण्यास मनाई, महिलांना ब्युटी पार्लरला जायला मनाई तसेच आयब्रो करायला मनाई, अज्ञात पुरुषाकडून मेंदी लावणे अथवा वॅक्सिंग करून घेणे यांना मनाई करणारे फतवे दारूल उलूमने जारी केले आहेत.
Admission of students will be canceled if the beard is removed
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींच्या दिवंगत वडिलांची खिल्ली उडवल्याबद्दल काँग्रेस नेते पवन खेरा यांच्याविरुद्ध वाराणसी आणि लखनऊमध्ये एफआयआर
- तुर्कस्तान-सीरियात पुन्हा भूकंप : 6.4 तीव्रता, इस्रायलपर्यंत जाणवले धक्के, 3 ठार, 213 जखमी
- मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान गायक सोनू निगमला धक्काबुक्की, ठाकरे गटाच्या आमदार पुत्रावर गुन्हा दाखल