• Download App
    ॲडमिरल दिनेश त्रिपाठी भारताचे नवे नौदल प्रमुख; आत्मनिर्भरतेच्या दिशेने नौदलाला बळकट करण्याचा निर्धार|Admiral Dinesh Tripathi, India's new Navy Chief; Determined to strengthen the Navy towards self-reliance

    ॲडमिरल दिनेश त्रिपाठी भारताचे नवे नौदल प्रमुख; आत्मनिर्भरतेच्या दिशेने नौदलाला बळकट करण्याचा निर्धार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी मंगळवारी (30 एप्रिल) नौदलाचे 26 वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी ॲडमिरल आर हरी कुमार यांची जागा घेतली आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी आईच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले.Admiral Dinesh Tripathi, India’s new Navy Chief; Determined to strengthen the Navy towards self-reliance

    दिनेश त्रिपाठी म्हणाले की, विकसित भारतासाठी योगदान देण्यासाठी आम्ही भारतीय नौदलाला स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने काम करू. ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी, जे कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरमधील तज्ञ मानले जातात, ते आतापर्यंत नौदलाच्या उपप्रमुखाची जबाबदारी सांभाळत होते.



    ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्याकडे दिल्लीत नौदल प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 60 वर्षीय त्रिपाठी हे 39 वर्षांपासून नौदलात आहेत.

    सैनिक शाळेत शिकले, विनाश-किर्च आणि त्रिशूल जहाजांचे नेतृत्व केले

    15 मे 1964 रोजी जन्मलेल्या ॲडमिरल त्रिपाठी यांना 1 जुलै 1985 रोजी भारतीय नौदलाच्या कार्यकारी शाखेत नियुक्त करण्यात आले. सैनिक स्कूल रीवाचे माजी विद्यार्थी ॲडमिरल त्रिपाठी यांनी नौदलाची कमान स्वीकारण्यापूर्वी नौदल उपप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळली होती.

    नौदल उपप्रमुख होण्यापूर्वी त्यांनी पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणूनही काम केले.

    Admiral Dinesh Tripathi, India’s new Navy Chief; Determined to strengthen the Navy towards self-reliance

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक