उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार असल्याच्या मारे राणा भीमदेवी थाटाच्या घाेषणा केल्या. परंतु, 403 पैकी केवळ 39 जागांवर उमेदवार शाेधतानाही नाकीनऊ अाले. मात्र, तरीही महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आता थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांनाच भिडायला चालले आहेत. उत्तर प्रदेश निवडणूक पर्यटनात अनेक ठिकाणी सभा घेणार आहेत. Aditya Thackeray’s election tourism, Only 39 of the 403 seats were contesting still going to campaign
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार असल्याच्या मारे राणा भीमदेवी थाटाच्या घाेषणा केल्या. परंतु, 403 पैकी केवळ 39 जागांवर उमेदवार शाेधतानाही नाकीनऊ अाले. मात्र, तरीही महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आता थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आ दित्यनाथ यांनाच भिडायला चालले आहेत. उत्तर प्रदेश निवडणूक पर्यटनात अनेक ठिकाणी सभा घेणार आहेत.
महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उत्तर प्रदेश दौऱ्यावर आ हेत. काही ठिकाणच्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी प्रचारात सहभागी होणार आहेत. यासंदर्भात संजय राऊत यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे.
उत्तर प्रदेशमधील डुमरियागंज विधानसभा मतदारसंघातील सिद्धार्थनगर, प्रयागराज जिल्ह्यातील कोरांव येथे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारसभांमध्ये आदित्य ठाकरे सामील होणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. भाजपला देशात आव्हान उभे करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसल्याचे सांगितले जात हाेते. परंतु, एकूण ४०३ जागांसाठीच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला केवळ ३९ उमेदवार मिळाले. शिवसेनेने ५९ उमेदवारांना तिकीट दिले होते. मात्र, यातील २२ जणांच उमेदवारी अर्ज बाद झाले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक शिवसेना दरवेळी लढत असते परंतु अद्याप यश मिळाले नाही.
Aditya Thackeray’s election tourism, Only 39 of the 403 seats were contesting still going to campaign
महत्त्वाच्या बातम्या
- रशियाची युक्रेनवर लष्करी कारवाई, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे पुतीन यांना आवाहन – आपल्या सैनिकांना हल्ले करण्यापासून रोखा!
- रशिया युक्रेनमधील युद्धामुळे भारतीय शेअर बाजारात हाहाकार, सेन्सेक्स 2000 पेक्षा अधिक अंकांनी, तर निफ्टी 600 अंकांनी कोसळला
- नवाब कोठडीत : ३०० कोटींच्या मालमत्तेची अवघ्या ५५ लाखांना खरेदी, अंडरवर्ल्ड कनेक्शनमुळे असे अडकले नवाब मलिक!
- Nawab Malik ED : नवाब मलिकांच्या समर्थनार्थ आंदोलनाकडे शिवसेनेची पाठ; चर्चेला तोंड फुटताच सुभाष देसाईंना पाठवले आंदोलनात!!