• Download App
    आधी राहुल गांधींना मिठी, उद्या तेजस्वी यादवांची भेट; आदित्य ठाकरे यांची उडी राष्ट्रीय राजकारणात थेट! Aditya Thackeray jumps directly into national politics

    आधी राहुल गांधींना मिठी, उद्या तेजस्वी यादवांची भेट; आदित्य ठाकरे यांची उडी राष्ट्रीय राजकारणात थेट!

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडून महाराष्ट्रातील सत्ता गमावल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रीय राजकारणात झेप घ्यायचा निर्णय घेतलेला दिसतो आहे. आधी राहुल गांधी यांच्या समवेत भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन त्यांनी राहुल गांधींना मिठी मारली आणि उद्या 23 नोव्हेंबर 2022 रोजी बिहारची राजधानी पाटणा येथे जाऊन आदित्य ठाकरे हे तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. Aditya Thackeray jumps directly into national politics

    केंद्रातील मोदी सरकार विरोधातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आणण्याच्या वरिष्ठ पातळीवरच्या जोरदार हालचाली सुरू असताना मध्यम आणि कनिष्ठ पातळीवर देखील त्या हालचालींना वेग आणून देण्याचा ठाकरे + यादव भेटीचा इरादा दिसतो आहे. तेजस्वी यादव यांची भेट घेण्याच्या वेळी आदित्य ठाकरे यांच्या समवेत खासदार अनिल देसाई आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी हे दोन राज्यसभेतले नेते असणार आहेत.

    स्थानिक पातळीवर डागडुजी नाही

    आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व करीत असलेल्या वरळी मतदारसंघात देखील शिवसेनेत उभी फूट पडली आहे. वरळीतले बहुसंख्य पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले आहेत, तर दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेच्या युवा सेनेत देखील मोठी फूट पडून युवा सेनेचे 35 पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले आहेत. परंतु आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात स्थानिक पातळीवरची कोणतीही राजकीय डागडुजी न करता थेट राष्ट्रीय राजकारणामध्ये मोठ्या हालचाली घडवून आणण्यासाठी उडी घेतल्याचे दिसत आहे.

    आता आदित्य ठाकरे यांची राष्ट्रीय राजकारणातली ही उडी यशस्वी ठरणार की स्थानिक पातळीवर डागडुजी न केल्याने शिवसेनेची जास्त पडझड होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

    Aditya Thackeray jumps directly into national politics

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    महिला आणि मराठा राजकारण करून थकले; ओबीसी राजकारणाच्या आश्रयाला पोहोचले!!

    Madhuri Elephant : कोल्हापूरच्या माधुरी हत्तिणीला परत आणण्यास PETA इंडियाचा आक्षेप; वनतारासारखी सुविधा महाराष्ट्रात नसल्याचा दावा

    Thackeray brothers : कॉंग्रेस आणि पवारांना ठाकरेंची सेना बाय-बाय करणार?