कक्षा बदलण्याची पुढील प्रक्रिया 15 सप्टेंबर रोजी पहाटे 2 च्या सुमारास पूर्ण होईल.
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : इस्रोच्या सौर मिशन आदित्य एल-1 ला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. वास्तविक, आदित्य एल-1ने तिसरी कक्षा यशस्वीपणे बदलली आहे. भारतीय संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने याबाबत माहिती दिली आहे. Aditya L1 Mission Another success for Aditya L1 on Sun mission third orbit change
इस्रोच्या म्हणण्यानुसार, आदित्य एल1ने तिसऱ्यांदा कक्षा बदलण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. इस्रोने या प्रसंगी सांगितले की, आदित्य एल-1 ने बंगळुरू येथील इस्ट्रॅक सेंटरमधून तिसऱ्यांदा पृथ्वीची कक्षा बदलण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. आदित्य एल-1 मिशनची कक्षा बदलण्याची प्रक्रिया बंगळुरूमध्ये इस्रोच्या टेलीमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (ISTRAC)च्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली. यासह, मॉरिशस, बंगळुरू, पोर्ट ब्लेअर येथे असलेल्या इस्रोच्या ग्राउंड स्टेशनवरून मिशनच्या प्रक्रियेचा मागोवा घेण्यात आला.
इस्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिशन आदित्य एल-1 ची नवीन कक्षा 296 किमी x 71767 किमी आहे. त्याची कक्षा बदलण्याची पुढील प्रक्रिया 15 सप्टेंबर रोजी पहाटे 2 च्या सुमारास पूर्ण होईल. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने 2 सप्टेंबर रोजी आपले महत्त्वाकांक्षी मिशन आदित्य एल-1 लाँच केले होते. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून याचे प्रक्षेपण करण्यात आले होते.
Aditya L1 Mission Another success for Aditya L1 on Sun mission third orbit change
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटकात भाजप-जेडीएस युतीची चर्चा कुमारस्वामींनी फेटाळली, जागा वाटपावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा
- देशद्रोह कायद्यावर 12 सप्टेंबरला सुनावणी; सर्वोच्च न्यायालयात 10 याचिका दाखल
- अयोध्येत 22 जानेवारीला प्रभु रामचंद्राची प्रतिष्ठापना, मोदींना पाठवले निमंत्रण; डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करणार
- द फोकस एक्सप्लेनर : G20 मध्ये चीनने केली घोडचूक! आता 55 देशांत कमी होणार आर्थिक घुसखोरी, अब्जावधी डॉलर्स पणाला