• Download App
    अधीर रंजन चौधरी बंगालमध्ये लढवताहेत काँग्रेसचा उरलेला बालेकिल्ला, पण खर्गेंनी मुंबईतून त्यांनाच दम दिला!! Adhir ranjan Chaudhry fighting against mamata banerji with Congress spirit, but mallikarjun kharge targets him

    अधीर रंजन चौधरी बंगालमध्ये लढवताहेत काँग्रेसचा उरलेला बालेकिल्ला, पण खर्गेंनी मुंबईतून त्यांनाच दम दिला!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अधीर रंजन चौधरी पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेसचा उरलेला लढवताहेत बालेकिल्ला, पण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुंबईतून त्यांनाच दम दिला!!, असे खरंच पश्चिम बंगाल आणि मुंबईत घडले. Adhir ranjan Chaudhry fighting against mamata banerji with Congress spirit, but mallikarjun kharge targets him

    याची कहाणी अशी :

    अधीर रंजन चौधरी 2019 ते 2024 लोकसभेतले काँग्रेसचे गट नेते होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर ते मजबूतपणे उभे राहून आर्ग्युमेंट करत असत. पश्चिम बंगाल मधल्या बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून ते अनेकदा निवडून आले. आजही ते तिथले काँग्रेस आणि डाव्या आघाडीचे उमेदवार आहेत.

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये मूळ काँग्रेस पक्षाला झिडकारले. त्यांना तृणमूळ काँग्रेस बरोबरच्या आघाडीत सामीलही करून घेतले नाही. उलट ममता बॅनर्जी यांनी गुजरात मधून युसुफ पठाण क्रिकेटरला आणून बहरामपूरमधून अधीर रंजन चौधरी यांच्या विरुद्ध उभे केले.



    स्वतः ममता बॅनर्जी यांनी इंडी आघाडीपासून विशिष्ट अंतर देखील राखले, इतकेच काय पण पश्चिम बंगाल मधल्या सगळ्या प्रचारात त्यांनी आपल्या टीकेचा रोख भाजप एवढाच काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्या आघाडीवर देखील ठेवला.

    ममता बॅनर्जींच्या या झंझावातापुढे अधीर रंजन चौधरी एकाकीपणे पश्चिम बंगाल मधला उरलेला काँग्रेसचा बालेकिल्ला लढवत आहेत. त्यासाठी ते उघडपणे ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूळ काँग्रेस पक्षाला अंगावर देखील घेत आहेत. असे असताना प्रत्यक्षात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मात्र अजय रंजन चौधरींच्या या आक्रमक भूमिकेविरोधात मुंबईच्या पत्रकार परिषदेत भाष्य केले. ममता बॅनर्जी जर इंडी आघाडीत आघाडीच्या सरकारमध्ये येऊ इच्छित असतील किंवा त्या बाहेरून पाठिंबा देणार असतील तर त्यांचे आम्ही स्वागत करू. याचा निर्णय काँग्रेस हायकमांड म्हणून आम्ही घेऊ. अधीर रंजन चौधरी याचा निर्णय घेऊ शकत नाहीत, असे मल्लिकार्जुन खर्गे मुंबईतल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

    ही एक प्रकारे खर्गे यांनी बंगाल मधला काँग्रेसचा बालेकिल्ला लढविणाऱ्या अधीर रंजन चौधरींना केलेली दमबाजीच होती. अधीर रंजन चौधरींनी देखील त्या दमबाजीला तितकेच कठोर प्रत्युत्तर दिले. काँग्रेस हायकमांड जो काही निर्णय घ्यायचा तो घेईल, पण मी मात्र ममता बॅनर्जींचे इंडी आघाडीत स्वागत करणार नाही, अशी ठाम भूमिका अधीर रंजन चौधरी यांनी घेतली. त्यामुळे काँग्रेस हायकमांड आपल्या राज्य पातळीवरच्या मोठ्या नेत्याचे देखील ऐकत नाही किंवा मोठ्या नेत्याच्या संघर्षात त्याला पाठिंबा देत नाही हे स्पष्ट झाले.

    Adhir ranjan Chaudhry fighting against mamata banerji with Congress spirit, but mallikarjun kharge targets him

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य