Saturday, 10 May 2025
  • Download App
    राहुल गांधींच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती; पण भाषणे करताना "काळजी" घेण्याच्याही कानपिचक्या!!; अधीर रंजन चौधरी करणार खासदारकी बहाल करण्याची मागणी|"Adhir Ranjan Chaudhary will demand restoration of MP

    राहुल गांधींच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती; पण भाषणे करताना “काळजी” घेण्याच्याही कानपिचक्या!!; अधीर रंजन चौधरी करणार खासदारकी बहाल करण्याची मागणी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशातील सर्व मोदींना चोर ठरवण्याचे भाषण करणाऱ्या राहुल गांधींच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. पण त्याच वेळी राहुल गांधींनी सार्वजनिक ठिकाणी भाषणे करताना काळजी घेतली पाहिजे, अशा कानपिचक्याही सुप्रीम कोर्टाने दिल्या. राहुल गांधींचे ते भाषण हे चांगल्या अभिरुचीचे लक्षण नव्हते, असे परखड निरीक्षण कोर्टाने नोंदविले.Adhir Ranjan Chaudhary will demand restoration of MP

    राहुल गांधींच्या शिक्षेला कोर्टाने स्थगिती दिल्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साह पसरला असून काँग्रेसचे लोकसभेतले गट नेते अधीर रंजन चौधरी राहुल गांधींची खासदारकी बहाल करण्याची मागणी लोकसभा अध्यक्षांकडे करणार आहेत.



    देशातील सर्व मोदींना चोर ठरवणारे भाषण राहुल गांधींनी कर्नाटकात केले होते. देशातल्या बँकांची कर्जे बुडवून परदेशात पळून जाणाऱ्या सगळ्या चोरांची नावे “मोदी” कशी??, असा सवाल त्यांनी केला होता. या मुद्द्यावरून गुजरात मधले भाजपचे एक नेते पुर्णेश मोदी यांनी सुरत कोर्टात राहुल गांधींविरुद्ध दावा दाखल केला होता. राहुल गांधींच्या त्या वादग्रस्त वक्तव्यातून संपूर्ण “मोदी समाजाची” बदनामी होते, अशा त्यांचा दावा होता.

    या दाव्यावर आधी सुरत कोर्टाने आणि नंतर गुजरात हायकोर्टाने राहुल गांधींना 2 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा फर्मावली होती. त्यामुळे लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यानुसार त्यांची खासदारकी गेली.

    सुप्रीम कोर्टाने मात्र आजच्या सुनावणीच्या वेळी राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर राहुल गांधींना या प्रकरणात जास्तीत जास्त शिक्षा का दिली??, कमीत कमी शिक्षा देता आले असतील आणि ती एक वर्षे 11 महिन्यांची होती, असे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदविले. त्याचवेळी राहुल गांधींच्या शिक्षेवर स्थगिती दिली. त्यामुळे राहुल गांधींची खासदारकी पुन्हा बहाल होण्याची शक्यता असून त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे तशा आशयाचा अर्ज केल्यावर लोकसभा अध्यक्ष त्यांची खासदारकी बहाल करू शकतात आणि त्यांना संसदेच्या विद्यमान अधिवेशनातच कारवाई मध्ये सहभागी होण्याचे परवानगी देऊ शकतात. राहुल गांधींना खासदारकी पुन्हा बहाल करून संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याची परवानगी देण्यासाठी काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी पुढे सरसावले असून ते आता लोकसभा अध्यक्षांकडे तशा आशयाचा अर्ज करणार आहेत.

    राहुल गांधींना शिक्षा दिल्यामुळे केवळ राहुल गांधींच्या सार्वजनिक जीवनावर परिणाम झालेला नसून तो त्यांना निवडून दिलेल्या मतदारांवर आणि सर्वसामान्य जनतेवर देखील झाला आहे, असे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदविले.

    Adhir Ranjan Chaudhary will demand restoration of MP

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    BSF : बीएसएफने पाकिस्तानचे अनेक दहशतवादी लाँच पॅड केले उद्ध्वस्त

    Operation sindoor : सियालकोट, चकलाला यांच्यासह 7 पाकिस्तानी हवाई आणि लष्करी तळांवर भारताचे हल्ले; ब्राह्मोस आणि S400 सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचे पाकिस्तानचे दावे खोटे!!

    Pakistani terrorists : BSF ने 7 पाकिस्तानी दहशतवाद्यांना केले ठार; S400-आकाशने पाकिस्तानी ड्रोन नष्ट केले