Tuesday, 29 April 2025
  • Download App
    TMC नेत्या महुआ मोईत्रांच्या अडचणीत वाढ, EDने PMLA कायद्यांतर्गत नोंदवला गुन्हा |Adding to TMC leader Mahua Moitras troubles ED has registered a case under the PMLA Act

    TMC नेत्या महुआ मोईत्रांच्या अडचणीत वाढ, EDने PMLA कायद्यांतर्गत नोंदवला गुन्हा

    भाजप नेते निशिकांत दुबे यांनी महुआवर गंभीर आरोप केले होते.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि माजी खासदार महुआ मोइत्रा यांच्या अडचणी वाढू शकतात. अंमलबजावणी संचालनालयाने आता महुआ मोईत्रांविरुद्ध पीएमएलए म्हणजेच भ्रष्टाचारविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.Adding to TMC leader Mahua Moitras troubles ED has registered a case under the PMLA Act

    महुआ मोइत्रावर पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप आहे. हे प्रकरण चांगलेच वादग्रस्त ठरले आहे. यानंतर महुआवर कारवाई करण्यात आली. या वादानंतरच ईडीने महुआंविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. आता ईडीनेही मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.



    संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या आरोपावरून सीबीआय या संपूर्ण प्रकरणाची सुरुवातीपासूनच चौकशी करत आहे. लोकपालच्या आदेशानंतर सीबीआयने तपास सुरू केला. त्याच वेळी, ईडी आधीच फेमा अंतर्गत महुआविरुद्ध तपास करत आहे. फेमा अंतर्गत ईडी महुआचीही चौकशी करणार आहे.

    डिसेंबर 2023 मध्ये महुआ मोईत्रा यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली. भाजप नेते निशिकांत दुबे यांनी महुआवर गंभीर आरोप केले होते. महुआने संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात आलिशान भेटवस्तू आणि पैसे घेतल्याचा आरोप भाजप नेत्याने केला होता. आरोपानुसार, महुआने व्यावसायिक दर्शन हिरानंदानीसाठी काम केले होते आणि त्याबदल्यात पैसे घेतले होते.

    Adding to TMC leader Mahua Moitras troubles ED has registered a case under the PMLA Act

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    BJPs attack : ‘काँग्रेस नेत्यांची विधानं असंवेदनशील अन् निर्लज्जपणाची आहेत’, भाजपचा हल्लाबोल!

    Pahalgam attack : चीनची राजनैतिक भाषा गोडी गुलाबीची; पण प्रत्यक्षात कृती पाकिस्तानला चिथावणी‌ द्यायचीच!!

    Tahawwur Rana : तहव्वुर राणाच्या कोठडीत १२ दिवसांची वाढ, NIA न्यायालयाचा निर्णय