वृत्तसंस्था
रांची : देशभरात राहुल गांधींनी अदानीच्या शेल कंपनीत 20000 कोटी रुपये आले कुठून?, या प्रश्नाने राजकीय गदारोळ उडवून दिलेला असताना प्रत्यक्षात अदानी समूहाच्या विविध कंपन्या शांतपणे आपले काम करताना दिसत आहेत. अदानी पॉवर लिमिटेड कंपनीने झारखंड मधील गोड्डा येथे जिल्ह्यात आपला पहिला 800 मेगावॅट क्षमतेचा अल्ट्रा सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर जनरेशन प्रकल्प सुरू केला असून त्यातून तब्बल 748 मेगावॅट वीज बांगलादेशाला निर्यात करण्यास सुरुवात देखील केली आहे. Adani Power Limited (APL), a part of the diversified Adani Group
अदानी पॉवर लिमिटेड कंपनीचा हा झारखंड मधला पहिला मोठा प्रकल्प असून त्यामुळे तेथे मोठी रोजगार निर्मिती होण्याबरोबरच बांगलादेशाला वीज निर्यात सुरू झाल्याने मोठे महसुली उत्पन्न देखील मिळणार आहे. अदानी पॉवर लिमिटेड कंपनीने या संदर्भातली महत्त्वाची घोषणा केली आहे.
अदानी समूहाची कामे थांबली नाहीत
शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडेनबर्ग रिपोर्ट नंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स प्रचंड कोसळले. अदानींच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणावर घट झाली. परंतु अदानी समूहाच्या कंपन्यांची कामे थांबली नाहीत. झारखंड मधील गोड्डा जिल्ह्यातील वीज प्रकल्प हे त्याचेच उदाहरण आहे.
काँग्रेस समर्थित सरकारचे सहकार्य
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे काँग्रेसने पाठिंबा दिलेले हेमंत सोरेन यांचे सरकार सत्तेवर आहे. या सरकारशी सहकार्य करून अदानी पॉवर लिमिटेड कंपनीने गोड्डा जिल्ह्यात वीज निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. काँग्रेसने राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली अदानी समूहाविरुद्ध जी राजकीय चळवळ चालवली आहे, या पार्श्वभूमीवर काँग्रेस समर्थित सरकार असलेल्या झारखंड राज्यात अदानी पॉवर लिमिटेड कंपनीने वीज निर्मिती प्रकल्प सुरू करणे आणि त्यातून वीज निर्यात करणे सुरू केले आहे, याला विशेष महत्त्व आहे.
Adani Power Limited (APL), a part of the diversified Adani Group
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्येत रामलल्लाचे घेणार दर्शन, लखनऊला पोहोचल्यावर केले ट्विट
- कोरोना महामारीचा डेटा मागितल्यावर चीनचे बेताल प्रत्युत्तर, WHOला इतर देशांचे टूल न बनण्याचा इशारा
- राहुल आता गप्प, पण पवारच पुन्हा काढतात सावरकरांचा विषय; काँग्रेस हायकमांड तीव्र नाराज; पवारांच्या “दुखऱ्या नसा” दाबण्याचे सूचक इशारे
- तामिळनाडूतील दह्याच्या वादानंतर आता कर्नाटकात अमूल VS नंदिनी; काँग्रेसचा आरोप- गुजरात मॉडेलची गरज नाही!