• Download App
    अदानी ग्रुप्सचा सर्वात मोठा करार! भारताच्या रेन्युअबल क्षेत्रातील एसबी एनर्जी कंपनीला 3.5 अब्ज डॉलरमध्ये खरेदी केले | Adani group’s largest ever deal in India's renewable sector, Buys SB Energy for $3.5 billion

    अदानी ग्रुप्सचा सर्वात मोठा करार! भारताच्या रेन्युअबल क्षेत्रातील एसबी एनर्जी कंपनीला 3.5 अब्ज डॉलरमध्ये खरेदी केले

     विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : अदाणी ग्रीन एनर्जी ली. ही जगातील सर्वात मोठी सौर उर्जा निर्मिती करणारी कंपनी आहे. ह्या कंपनीने नुकतीच एक मोठी डील केली आहे. ह्या डील अंतर्गत अदाणी कंपनीने एस बी एनर्जी इंडिया ह्या कंपनीवर ताबा मिळवला आहे. 3.5 अब्ज डॉलर्स ह्या रकमेवर ही डील करण्यात आली आहे असे  कंपनीने सोमवारी सांगितले.

    Adani group’s largest ever deal in India’s renewable sector, Buys SB Energy for $3.5 billion

    या करारानंतर एस बी कंपनी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीची उपकंपनी म्हणुंन काम करेल. ह्या करारा नंतर एस बी एनर्जी कंपनी ही अदानी ग्रुप्सची भारतातील 100 % भागीदारी असणारी सहाय्यक कंपनी बनली आहे. या पूर्वी एस बी एनर्जी जपान स्थित भारती ग्रुप आणि सोफ्टबँक ग्रुप ह्या कंपनीची भारतातील 80% भागीदार असलेली सहायक कंपनी होती.


    Gautam Adani : तीन दिवसांत गमावले 69 हजार कोटी, आशियातील श्रीमंतांच्या यादीतील दुसरा क्रमांकही गमावला


    3.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे 26,000 कोटी रुपये इतक्या मोठ्या रकमेची ही डील भारतातील रेन्युअबल ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठी डील आहे.

    जेपी मॉर्गन इंडिया इन्व्हेस्टर समिटमध्ये बोलताना अदानी समूहाचे अध्यक्ष म्हणाले कीम अदानि ग्रुप 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक अक्षय ऊर्जा निर्मिती, घटक उत्पादन, प्रसारण आणि वितरणात मध्ये करण्यचा विचार करत आहे.

    Adani group’s largest ever deal in India’s renewable sector, Buys SB Energy for $3.5 billion

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते