विशेष प्रतिनिधी
मुंबई : 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या कोहिनुर या चित्रपटातील ‘मधुबन मे राधिका नाचरे’ या गाण्याचा नुकताच रिमेक तयार करण्यात आला आहे. कनिका कपूरने हे गाणे गायले आहे. अभिनेत्री सनी लिओनेनी यामध्ये डान्स केला आहे तर या गाण्याचे म्युझिक कम्पोजर आहेत साकिब तोशी. तीन दिवसांपूर्वीच हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. आणि या तीन दिवसांमध्येच या गाण्याला प्रचंड चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे.
Actress Sunny Leone’s Madhuban May Radhika Nachre song in trouble! Remove the video or face legal action; Madhya Pradesh Home Minister Narottam Mishra
अतर आता मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी अभिनेत्री सनी लिओनीला आणि गाण्याच्या मेकर्सना हे गाणे तातडीने सर्व प्लॅटफॉर्म्सवर काढून टाकण्याचे सांगितले आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत या गाण्यामुळे असे त्यांचे मत आहे.
सनी लियोनी कामगारांसाठी करणार हे काम, दहा हजार जणांना देणार जेवण
पुढे ते म्हणतात की, लवकरात लवकर हे गाणे जर सर्व प्लॅटफॉर्म वरून काढून टाकण्यात आले नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल. साकिब तोशीला उद्देशून ते म्हणतात की, तुम्ही स्वत:च्या धर्मावर गाणी बनवा. फक्त मिश्राच नाही तर उत्तर प्रदेशमधील हिंदू धर्मगुरू संत नावल गिरी महाराज यांनी देखील या गाण्यावर आक्षेप घेतला होता.
नरोत्तम मिश्रा हे तेच आहेत ज्यांनी डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांच्या ज्वेलरीच्या जाहिरातीवर देखील आक्षेप घेतला होता. त्याचप्रमाणे डाबरच्या करवा चौथच्या लेस्बियन जाहिरातीवर देखील यांनी आक्षेप घेतला होता.
Actress Sunny Leone’s Madhuban May Radhika Nachre song in trouble! Remove the video or face legal action; Madhya Pradesh Home Minister Narottam Mishra
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : पंतप्रधान मोदी यांचे देवेंद्रजींकडून आभार महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र
- WATCH : खडसे…हिंमत असेल तर ऑडिओ क्लीप्स वाजवाच आमदार चंद्रकांत पाटलांचे थेट आव्हान
- पनवेलच्या फार्म हाऊसवर सलमान खानला चावला साप, बिनविषारी साप असल्याने बचावला
- बिहार : कुरकुरे आणि नूडल्स फॅक्टरीमध्ये बॉयलर फुटला , ६ जणांचा मृत्यू ; १२ जखमी