प्रतिनिधी
मुंबई : पॉर्न फिल्म प्रॉडक्शन प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अटक केली. त्याला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. Actress Shilpa Shetty’s husband & businessman Raj Kundra and one Ryan Tharp sent to police custody till 23
राज कुंद्राला अटक केल्यानंतर अनेक गोष्टी समोर येत असून, अभिनेत्री सागरिका सोना सुमनने खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. राज कुंद्राने एका वेबसिरीजचे काम देतो असे सांगून आपल्याला न्यूड ऑडिशन द्यायला सांगितले होते, असा आरोप सागरिकाने केला आहे.
सागरिकाने सोशल मीडियावर तिचा विडिओ अपलोड केला आहे. यात तिने राज कुंद्रावर वरील आरोप केला आहे. यात ती म्हणते की मी सागरिका सोना सुमन. हे अश्लील चित्रपटांचे एक मोठे रॅकेट आहे. यामध्ये मोठ मोठे लोक सामील आहेत.
राज कुंद्रा याचे नाव समोर आले आहे. त्याचा लॉकडाउनच्या काळात मलाही एक वाईट अनुभव आला होता. ऑगस्ट २०२० मध्ये मला एका वेब सीरिजमध्ये काम करण्याची त्याने ऑफर दिली होती. मी होकार दिल्यानंतर राज कुंद्राच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर उमेश कामत याचा मला फोन आला.
माझी ऑनलाइन ऑडिशन घेण्याचे ठरले. मी व्हिडीओ कॉलमध्ये सहभागी झाल्यानंतर माझ्याकडे न्यूड ऑडिशन देण्याची मागणी केली गेली. मला धक्काच बसला आणि मी नकार देत कॉल बंद केला. हा अनुभव सागरिकाने शेअर केला आहे.
तत्पूर्वी, राज कुंद्रा आणि रायन थार्पला पोलीसांनी अटक करून कोर्टात हजर केले. त्यांच्या पुढच्या तपासासाठी त्यांना २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
Actress Shilpa Shetty’s husband & businessman Raj Kundra and one Ryan Tharp sent to police custody till 23
महत्त्वाच्या बातम्या
- Monsoon Session : राज्यसभेची कार्यवाही पुन्हा सुरू झाली, विरोधकांच्या गोंधळातच कोरोना महामारीवर चर्चा
- बकरी ईदच्या पूर्वसंध्येला इराकची राजधानी बगदादमध्ये भीषण बॉम्बस्फोट; 30 जण ठार, 35 जखमी
- 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : 11वी प्रवेशासाठीच्या CET चे वेळापत्रक जाहीर, अशी असेल प्रक्रिया
- Saamana Editorial : स्वातंत्र्यलढ्यावेळी असणारा हिंमतवाला काँग्रेस पक्ष आता उरला नाही, सामना अग्रलेखातून काँग्रेसला कानपिचक्या, संघाची केली स्तुती
- ब्रिटनमध्ये मास्क घालण्याबाबतचे निर्बंधही शिथिल, अनलॉकची प्रक्रिया सुरू