विशेष प्रतिनिधी
मुबंई : कहो ना प्यार है, यादे, फिर भी दिल है हिंदुस्थानी या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री काम्या पंजाबी सोशल मिडीयावर बरीच सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या विधानांमुळे देखील चर्चेमध्ये असते. नुकताच तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर महिला सशक्तीकरण बाबत एक व्हिडिओ शेअर केला होता. यावर एका यूजरने कमेंट केली की, “आपले स्वतःचे लग्न वाचवू शकली नाहीस, घटस्फोट झाला. दुसरं लग्न केलंस. हे अतीच झालं. असं त्याने कमेंट केली हाेती.
Actress Kamya Punjabi gets angry at a user who trolled her over divorce
या कमेंटला तिने लगेचच रिप्लाय करत म्हटले आहे की, मला आनंदी राहण्याचा अधिकार नाही का? जर घटस्फोट झाला तर मुलीचं आयुष्य संपवून जातं का? तिला जगण्याचा काहीच अधिकार नाही का? तुमच्यासारख्या लोकांच्या विचारसरणी विरुद्ध आज प्रत्येक मुलीला आवाज उठवला पाहिजे. एव्हाना बऱ्याच मुली आवाज उठवत देखील आहेत. मला तुम्ही आजिबात कमजोर समजू नका. मी सबळ आहे. अशा शब्दांमध्ये तिने प्रत्युत्तर दिले.
https://www.instagram.com/tv/CXODs-BBDd1/?utm_source=ig_web_copy_link
समांथा झळकणार ‘द अरेंजमेंट ऑफ लव्ह’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटात
काम्या पंजाबी ने दिलेले उत्तर अतिशय योग्यच आहे. घटस्फोट झालेली स्त्री असो किंवा सिंगल वुमन असो बरेच पुरुष तिच्याकडे एक अव्हेलेबल ऑप्शन म्हणून बघतात वर तिच्या बद्दल वाईट बोलायलाही मागे पुढे पाहत नाहीत. ही मानसिकता त्यांचा प्रॉब्लेम असला तरी त्यांना ह्याची जाणीव नसते. ही वाईट गोष्ट आहे.
2003 मध्ये काम्याने बंटी नेगीसोबत लग्न केले होते. 2013 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्या दोघांना आरा नावाची मुलगी देखील आहे. घटस्फोटानंतर 7 वर्षांनी म्हणजेच मागच्यावर्षी तिने दुसरे लग्न केले आहे. तेव्हा देखील तिला बऱ्याच लोकांनी ट्रोल केले होते.
घटस्फोट हा शब्द शिवी सारखा का वापरला जातो? इथे कोणाला नव्याने आयुष्य सुरू करायचे असेल, कुणाला सिंगल पॅरेंट व्हायचे असेल तर त्यांना ट्रोल का केले जाते? असा प्रश्न तिने त्यावेळी देखील उपस्थित केला होता.
Actress Kamya Punjabi gets angry at a user who trolled her over divorce
महत्त्वाच्या बातम्या
- CDS Rawat Death : पहिले सीडीएस रावत यांच्या निधनाने देश शोकसागरात, जगभरातून उमटल्या प्रतिक्रिया, वाचा.. कोणकोणत्या देशांनी व्यक्त केला शोक!
- सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे” ग्रंथाचे उद्या डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन
- Rajnath Singh in Parliament : सीडएस बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळल्यावर काय झाले? घटनेची चौकशी कोण करणार? राजनाथ सिंह यांनी संसदेला दिली माहिती
- नव्या सीडीएसपुढे नवी आव्हाने; थिएटर कमांडची निर्मिती – कार्यवाही!!