वृत्तसंस्था
कीव्ह : रशियाचे युक्रेनवरील हल्ले अद्याप सुरूच असून अभिनेत्रीपाठोपाठ बॅले डान्सरचाही मृत्यू झाला आहे. गोळीबारात या बॅले डान्सरचा मृत्यू झाला आहे. Actress and ballet dancer die; Russia’s attacks on Ukraine continue
शुक्रवारी रशियन सैन्याने राजधानी कीव्ह शहरातील निवासी भागांवर केलेल्या रॉकेट हल्ल्यांत प्रसिद्ध अभिनेत्री ओक्साना श्वेत्स (वय ६७) यांचा मृत्यू झाला होता. आता रशियाच्या हल्ल्यात एका प्रसिद्ध बॅले डान्सर आर्टिओम डॅटसिशिन यांचा मृत्यू झाला आहे. तीन आठवड्यांपूर्वी रशियन सैनिकांच्या गोळीबारात जखमी झालेल्या डॅटसिशिन यांचे गुरुवारी निधन झाले. ते ४३ वर्षांचे होते, असे वृत्त आहे.
दरम्यान, युक्रेनमध्ये संघर्ष सुरू झाल्यापासून सुमारे ६०० नागरिक मारले गेले आहेत आणि १ हजारहून अधिक जखमी झाले. पण प्रत्यक्षात जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे.