कोरोना महामारीच्या काळात गोरगरीबांना मदत करणारे अभिनेते सोनू सूद राजकारणात प्रवेश करणार असल्याची शक्यता गेल्या अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात होती. मात्र, सोनू सूद नव्हे तर त्यांची बहिण राजकारणात प्रवेश करणार आहे. पंजाबमधील मोगा मतदारसंघातून त्या लढणार आहेत. विशेष म्हणजे सर्वच पक्षांकडून त्यांना ऑफर असली तरी कोणत्या पक्षाकडून लढणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.Actor Sonu Sood’s sister to contest from Moga in Punjab,
विशेष प्रतिनिधी
चंदीगड : कोरोना महामारीच्या काळात गोरगरीबांना मदत करणारे अभिनेते सोनू सूद राजकारणात प्रवेश करणार असल्याची शक्यता गेल्या अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात होती. मात्र, सोनू सूद नव्हे तर त्यांची बहिण राजकारणात प्रवेश करणार आहे. पंजाबमधील मोगा मतदारसंघातून त्या लढणार आहेत. विशेष म्हणजे सर्वच पक्षांकडून त्यांना ऑफर असली तरी कोणत्या पक्षाकडून लढणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
सोनू सूद हे पंजाबमधील मोगा जिल्ह्याचे आहेत. आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना, सोनू सूद म्हणाला, माझी बहीण मालविका राजकारणात प्रवेश करणार आहे; परंतु, माझा राजकारणात येण्याचा इरादा नाही. माझ्याबहिणीने पूवीर्ही खूप चांगले काम केले आहे. पंजाबची सेवा करण्यासाठी मालविका निश्चित येईल, असे आज आम्हाला अधिकृतपणे सांगायचे आहे. मालविका कोणत्या राजकीय पक्षात सामील होणार, यासंदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही. वेळ येईल तेव्हा तुम्हाला खात्रीने कळविले जाईल. राजकारणात प्रवेश करण्याबाबत मी विचार केलेला नाही. मालविका यांचा मोगामध्ये जनतेशी चांगला संपर्क आहे. माझ्याबाबत सांगायचे तर, मी राजकारणात येण्यासंबंधी विचारच केलेला नाही.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीबाबत विचारले असता सूद म्हणाले की, दोन्ही चांगले आहेत. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबिर सिंग बादल यांनाही भेटणार आहे. बादल यांना राजकारणाचा मोठा अनुभव आहे.
शेतकºयांच्या आंदोलनाबाबत सोनू सूद म्हणाले की, शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळणे आवश्यक आहे. त्यांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजेत, जेणेकरून ते आपापल्या शेतात परतू शकतील. आपण आज जे काही खातो, ते शेतकºयांमुळेच. तेव्हा ते खूश असणे महत्त्वाचे आहे. यावेळी राज्यातील आरोग्य सेवा व्यवस्था सुधारण्यावर भर दिला.
प्राप्तीकराच्या छाप्यांविषयी बोलताना सोनू सून म्हणाले, अनेक अडचणींना सामोरे जात मी जनतेसाठी लढा चालू ठेवला असल्याचेपंजाबमध्ये बेरोजगारीचा मोठा मुद्दा आहे. रोजगार मिळत नसल्याने ते ड्रग्जच्या आहारी जातात. या मुद्द्यावर आम्ही काम करीत आहोत. तर मालविका यांनी सांगितले की, मी आरोग्य आणि शिक्षणांशी संबंधित प्रश्न सोडविण्याच्या दिशेने काम करीत आहे.
Actor Sonu Sood’s sister to contest from Moga in Punjab,
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी