अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद सच्चर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शनिवारी सायंकाळी उशिरा त्यांना पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व मिळाले. त्या मोगामधून काँग्रेसच्या उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याची औपचारिक घोषणा सोमवारी होण्याची शक्यता आहे.Actor Sonu Sood sister Malvika Sood joins Congress, likely to contest from Punjab’s Moga
वृत्तसंस्था
चंदिगड : अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद सच्चर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शनिवारी सायंकाळी उशिरा त्यांना पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व मिळाले. त्या मोगामधून काँग्रेसच्या उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याची औपचारिक घोषणा सोमवारी होण्याची शक्यता आहे.
सोनू सूद राजकारणात सक्रिय असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या. मोगा येथील अनेक समाजसेवेच्या कार्यक्रमात ते सहभागी होत होते. त्यांनी स्वतः राजकारणात येण्यास नकार दिला असला तरी बहिणीला मात्र पुरेपूर पाठिंबा देत आहेत.
स्टेट आयकॉन म्हणून सोनू सूदची नियुक्ती रद्द
तत्पूर्वी, भारतीय निवडणूक आयोगाने चित्रपट अभिनेता सोनू सूदची पंजाबचा स्टेट आयकॉन म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली होती. वर्षभरापूर्वी निवडणूक आयोगाने सोनू सूदला पंजाबचा आयकॉन बनवले होते. पंजाबचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. करुणा राजू यांनी शुक्रवारी अधिकृत निवेदनात सांगितले की, निवडणूक आयोगाने 4 जानेवारी रोजी पंजाबचे स्टेट आयकॉन म्हणून सूद यांची नियुक्ती रद्द केली होती.
गतवर्षी नोव्हेंबरमध्ये सोनू सूदने त्याची बहीण राजकारणात येत असल्याबद्दल सांगितले होते, परंतु त्याचा स्वत:साठी असा कोणताही विचार नव्हता. पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील, कोविड लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केल्याबद्दल सोनू सूद गतवर्षी राष्ट्रीय प्रसिद्धीच्या झोतात आला होता. काही दिवसांपूर्वी सोनू सूदने आम आदमी पार्टीचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी झालेल्या भेटीनंतर तो राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या. यानंतर सोनू सूदने पत्रकार परिषदेत आपली बहीण मालविका आणि तिचे कुटुंबीय येत्या काही दिवसांत निवडणुकीच्या रणनीतीसह पक्षाची घोषणा करतील, असे सांगितले होते.
Actor Sonu Sood sister Malvika Sood joins Congress, likely to contest from Punjab’s Moga
महत्त्वाच्या बातम्या
- बुल्ली बाईनंतर सुली डील्सच्या मास्टरमाइंडला इंदूरमधून अटक, २५ वर्षीय ओंकारेश्वर ठाकूर हा बीसीएचा विद्यार्थी
- आता डेल्टाक्रॉनची भीती : कोरोनाचा घातक व्हेरिएंट ‘डेल्टाक्रॉन’ सायप्रसमध्ये आढळला, ओमिक्रॉन आणि डेल्टा प्रकाराचे मिश्र स्वरूप
- संसद भवनात कोरोनाचा स्फोट : ४०० हून अधिक कर्मचारी संक्रमित, दैनंदिन रुग्णसंख्येत २१ टक्क्यांनी वाढ
- सांगलीत पुन्हा बैलगाड्यांच्या शर्यतीचा थरार : शर्यतीच्या बैल गाड्यांच्या मागणीत मोठी वाढ